शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘बायको म्हणाली, माझ्या पोटात तुझ्या मित्राचं मुल वाढतंय, मला घटस्फोट दे’; क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची स्टोरी प्रचंड व्हायरल

एप्रिल 22, 2022 | 11:10 am
in संमिश्र वार्ता
0
dinesh kartik

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मिडियामध्ये विविध प्रकारच्या बाबी व्हायरल होतात. त्यात काही खऱ्या असतात तर काही खोट्या. तसेच, काही काल्पनिक कथा आणि रंगविलेल्या काही घटनाही फॉरवर्ड होतात. आताही अशीच एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ती आहे क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची. दिनेश कार्तिकची पत्नी एके दिवशी त्याच्या जवळ आली आणि त्याला म्हणाली तुझ्या मित्राचं मुल माझ्या पोटात वाढतंय. मला आता घटस्फोट हवा आहे. पत्नीच्या त्या एका वाक्याने दिनेश हादरला आणि थेट डिप्रेशनमध्ये गेला. त्यातून तो कसा बाहेर आला, अशी ही कथा आहे. ही पोस्ट सध्या अनेकांना भावते आहे. तुम्हीही बघा काय आहे ही पोस्ट

अशी आहे व्हायरल पोस्ट
आयुष्यात आपल्या सोबत काय घडते हे आपल्या हातात बऱ्याचदा नसते परंतु आलेली आकस्मिक संकटे , अपयश यांना आपण रिस्पॉन्स (रिऍक्ट नव्हे) कसे करतो याची लेटेस्ट स्टोरी म्हणजे दिनेश कार्तिक!
एक वेळी होती जेव्हा दिनेश कार्तिक हा खेळाडू भारतीय संघात चांगली कामगिरी करत होता. धोनी नंतर विकेटकिपर म्हणून त्याचीच ओळख होती. तसेच तो तामिळनाडूचा कॅप्टन पण होता. पण याच काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वादळ घोंघावत होते.

तामिळनाडू संघातील त्याचा सहकारी आणि मित्र मुरली विजय याचे दिनेश कार्तिकच्या बायकोबरोबर प्रेमसंबंध होते. या गोष्टीची पुसटशी देखील कल्पना दिनेश कार्तिकला नव्हती. पूर्ण टीमला मात्र हे प्रकरण माहीत होते. एके दिवशी अचानक दिनेश कार्तिकची बायको आली आणि त्याला म्हणाली, ‘माझ्या पोटात मुरली विजयचे मूल असून मला घटस्फोट हवा आहे.’ पायाखालची जमीन सरकणे म्हणजे काय असते, याचा अनुभव त्या दिवशी दिनेश कार्तिकला आला.

दिनेशची बायको घटस्पोट घेऊन मुरली विजय सोबत संसारात रमली तर मुरली विजय पण चेन्नई सुपर किंगस कडून चांगली कामगिरी करत होता. दुसरीकडे दिनेश कार्तिक मात्र पूर्णपणे आयुष्यातुन उठला होता. इतका मोठा झटका पचवणे कुणालाही सहजासहजी शक्य नसते. तो पूर्ण डिप्रेशनमध्ये गेला. त्याचा फटका त्याला लगेच बसला. भारतीय संघातील त्याची जागा चालली गेली. त्याची कामगिरी इतकी खालावली की त्याच्या कडून तामिळनाडू रणजी संघाची कॅप्टनसी काढून घेऊन तीच मुरली विजयला देण्यात आली. अशावेळी त्याच्या मनःस्थितीची कल्पना तुम्ही करू शकता.

आता आत्महत्या करून जीवन संपवून टाकावे असे त्याच्या मनात येऊ लागले होते. एके दिवशी त्याला ट्रेनिंग देणारा ट्रेनर त्याला भेटायला गेला असता त्याने त्याची ही अवस्था बघितली. ट्रेनरने त्याला जबरदस्ती जिमला नेले. तिथे दीपिका पल्लीकल ही राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू पण येत असे. तिने दिनेश कार्तिकची ही अवस्था बघून त्याला आधार दिला. दोघांनी मिळून हळूहळू ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली.

दीपिकाच्या आधाराचा परिणाम आत दिसू लागला. दिनेश कार्तिक प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धुवांधार बॅटिंग करू लागला. त्याला भारतीय संघात पण घेतले गेले आणि तो कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा कॅप्टन पण झाला. दुसरीकडे मुरली विजयची कामगिरी खालावत चालली होती. तो चेन्नई सुपर किंगसमधून पण बाहेर फेकला गेला.

2018 साली निदाहस ट्रॉफीच्या फायनलमध्ये सिक्स मारत दिनेश कार्तिकने भारताला सामना जिंकून दिला आणि तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. दिनेश कार्तिकने आपल्या तडाखेबंद कामगिरीने आपण संपलेले नसून फिनिक्सप्रमाणे पुन्हा भरारी घेऊन परत आलो आहोत हे दाखवून दिले. दीपिका पल्लीकल सोबत लग्न करून या दोघांना जुळी मुले झाली. डिलिव्हरीच्या अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये दीपिका पल्लीकलने अनेक पदके कमावत आपल्या नवऱ्याप्रमाणे आपण पण कमी नाही हे सिद्ध केले.

पुढे या जोडप्याने आपले स्वप्नातले भव्य घर विकत घेतले आणि आपला सुखी संसार सुरू ठेवला. दिनेश कार्तिक हे नाव त्याच याच सर्व मातीन मिसळून पुन्हा मुसंडी मारण्याच्या ईच्छाशक्तीमुळे जगभर ओळखले जायला हवे इतके प्रेरणादायी आहे.
Dreams suffering love अशी ही स्टोरी आहे

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अंगणात झोपलेल्या युवतीचा विनयभंग; न्यायालयाने सुनावली ३ वर्षे कारावासाची शिक्षा

Next Post

अजित पवार आणि नितीन राऊत यांच्यातील वादामुळे राज्यात लोडशेडिंग?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
load shading electricity

अजित पवार आणि नितीन राऊत यांच्यातील वादामुळे राज्यात लोडशेडिंग?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011