इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिकेटपटू आणि त्यांच्या बायका हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. अगदी जुन्या काळापासून आतापर्यंत या विषयाची लोकांना कायमच उत्सुकता लागलेली असते. स्टार क्रिकेटपटूंच्या लग्नाची बातमी आली की त्यांची होणारी बायको कोण आहे, हे जाणून घेण्याचीही उत्सुकता तेवढीच असते. सध्या भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याच्या लग्नाच्या निमित्ताने सध्या हीच चर्चा जोरात आहे.
अभिनेता सुनील शेट्टी याची कन्या आणि बॉलिवूड नटी आतिथ्या शेट्टी आणि सलामीवीर फलंदाज के.एल. राहूल यांचा विवाह सोहळा पार पडला. आतिथ्या शेट्टी काय करते, हे साऱ्यांनाच माहिती आहे. पण अक्षर पटेल याच्या बायकोबद्दल मात्र फार कमी लोकांना माहिती आहे. अक्षरचा विवाह सोहळा अलीकडेच पार पडला. त्याचं लग्न एका डायटिशीयनसोबत झालं आहे. मेहा पटेल असे तिचे नाव असून ती न्यूट्रिशनिस्ट सुद्धा आहे. मेहा सेलिब्रिटी नसली तरीही ज्या दिवशी अक्षरसोबतचे तिचे संबंध उघड झाले त्यादिवसापासून तिचे फॉलोअर्स सुद्धा वाढायला लागले.
सध्या तिचे इन्स्टाग्रामवर २७ हजार फॉलोअर्स असून दिवसेंदिवस वाढत आहेत. अक्षरच्या लग्नाच्या मिरविणुकीचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. त्यात त्याची वरात घोड्यावरून न निघता कारमधून निघाल्याचे दिसत आहे. अक्षरसोबत त्याचे सगळे कुटुंबीय तर आहेतच, शिवाय लग्नाच्या मांडवात त्याच्या बाजुला क्रिकेटपटू जयदेव उनाडकट आणि त्याचं कुटुंबही दिसत आहे. अक्षरच्या हळदीच्या आणि मेंदीच्या कार्यक्रमातही जयदेव त्याच्यासोबत होता, असे कळते.
https://twitter.com/Meha2026/status/1618869913413877762?s=20&t=zAkPcJHtiPYI0TMRlpW3Tw
पहिले प्रेम नंतर विवाह
अक्षर आणि मेहा बरेच दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांमध्ये छान मैत्री होती, नंतर त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आता त्यांचे लग्न झाले. मेहाने अक्षरसोबतचे अनेक फोटो आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केल्याने त्याच्या चाहत्यांना आधीच याबद्दल माहिती झाले होते.
रिल्सची आवड
मेहाला रिल्स बनविण्याची खूप आवड आहे. ती सातत्याने रिल्स तयार करत असते. तिला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे बहुतांश फॉलोअर्स तिचेच आहेत. पुढे अक्षरची एन्ट्री झाल्याने भर पडली. तिच्या हातावरही अक्षरच्या नावाचा टॅट्यू आहे.
अक्षरचा तात्पुरता ब्रेक
अक्षर पटेलने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत दमदार कामगिरी केली होती. या मालिकेनंतर त्याचे लग्न झाले. त्यामुळे त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे आणि टी-२० मालिकेतून ब्रेक घेतला आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात आजपासून टी-२० मालिका सुरू होत आहे.
https://twitter.com/Meha2026/status/1618841323645325312?s=20&t=zAkPcJHtiPYI0TMRlpW3Tw
Cricketer Akshar Patel Married with Meha Patel