मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी केल्यानंतर तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष व भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्यासोबत त्याचा संवाद जवळपास संपला होता. पण त्यांच्यातील वाद कायम असल्याचे संपूर्ण जगाने दोन दिवसांपूर्ण मैदानातच अनुभवले.
दोन दिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलचा सामना रंगला. या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला. बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर सौरव गांगुली सध्या दिल्ली संघाचा मार्गदर्शक आहे. त्यामुळे गांगुली आणि कोहली दोघेही कुठल्या ना कुठल्या प्रसंगाला आमने-सामने येणार हे निश्चित होते. आणि अगदी तसेच झाले. या सामन्यात विराटने अर्धशतक झळकावले आणि तो सामनावीरही ठरला.
https://twitter.com/_itz_mksoni25/status/1647753687585148928?s=20
अर्धशतक झळकावल्यानंतर बाद झाल्यावर कोहली पॅव्हेलियनमध्ये परतत होता. त्यावेळी सौरव गांगुली आपल्या टीमसोबत बसला होता. कोहली त्याच्याकडे बघत होता. पण गांगुलीने एक नजरही त्याच्याकडे बघितले नाही. हा क्षण चाहत्यांनी कॅमेरात टिपला आणि तो सोशल मिडियावर व्हायरल केला. असाच आणखी एक प्रसंग घडला. विराट ओपनिंगला जाण्यासाठी सज्ज होता. तो पॅड बांधून तयार होता. त्याच्या अगदी समोरून सौरव गांगुली गेला, पण त्याने विराटकडे बघितलेही नाही. अर्थात त्याहीवेळी विराट गांगुलीकडे बघत राहिला. गांगुलीच्या मागे त्याच्या टीममधील इतर खेळाडू गेले. त्यांच्यातील जवळपास सर्वांनी विराटकडे स्मित हास्य केले. पण, गांगुलीने ते टाळले.
दरम्यान, विराट कोहलीने सौरव गांगुलीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे.
https://twitter.com/iromeostark/status/1647235981366677504?s=20
Cricket Virat Kohli Sourav Ganguly Unfollow