मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रिकेट हा असा खेळ आहे की, त्यामध्ये खेळाडू वेगवेगळ्या प्रकारचे विक्रम करीत असतात. त्यातही भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, राहूल द्रविड आदी खेळाडूंनी वेगवेगळे विक्रम केले आहेत. आता या विक्रमवीरामध्ये आणखी एकाची भर पडली तो म्हणजे रोहित शर्मा होय. श्रीलंके विरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात रोहित शर्माने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला. त्याच्या खेळी दरम्यान, तो भारतासाठी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. याआधी भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. इतकेच नाही तर रोहित शर्मा आता क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत भारतासाठी 97 सामन्यांच्या 89 डावांमध्ये 51.50 च्या सरासरीने 3296 धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माने आता त्याला मागे टाकले आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 123 सामन्यांच्या 115 डावांमध्ये 33.07 च्या सरासरीने 3307 धावा केल्या आहेत. भारतासाठी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर आहे. केएल राहुलने आतापर्यंत 56 सामन्यांत 40.68 च्या सरासरीने 1831 धावा केल्या आहेत. याशिवाय रोहित शर्मा आता T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. त्याने मार्टिन गप्टिलचा विक्रम मोडीत काढत ही कामगिरी केली. मार्टिन गप्टिलच्या नावावर आतापर्यंत 3299 धावा झाल्या आहेत.
T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे जगातील अव्वल 5 फलंदाज असे
1 ) 3307 धावा – रोहित शर्मा,
2 ) 3299 धावा – मार्टिन गुप्टिल,
3 )3296 धावा – विराट कोहली,
4 ) 2776 धावा – पॉल स्टारलिंग,
5 ) 2686 धावा – आरोन फिंच.