मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
क्रिकेट हा भारतीयांचा जीव की प्राण आहे. भारतात क्रिकेटवर नितांत प्रेम केले जाते. त्यामुळेच क्रिकेट बरोबरच क्रिकेटपटूंचे चाहते लाखो आहेत. क्रिकेटपटूंविषयी जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक असतात. क्रिकेटपटूसाठी पुजाअर्चा करण्यापासून तर त्यांच्यासाठी ढसाढसा रडणारेही चाहते आहेत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. परिणामी, भारतीय क्रिकेटपटूही गर्भश्रीमंत आहेत. मात्र, आज आपण अशा क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेणार आहोत की त्यांच्या पत्नीही गर्भश्रीमंत घरातून आलेल्या आहेत. चला तरम वेळ न दवडता जाणून घेऊया
सचिन व अंजली तेंडुलकर
सचिन तेंडुलकरने १९९५ मध्ये डॉ. अंजली मेहताशी लग्न केले. वास्तविक अंजली लहानपणापासूनच अतिशय श्रीमंत कुटुंबातली होती. अंजलीचे पणजोबा एक श्रीमंत जमीनदार होते आणि तिचे वडील आनंद मेहता हे एक मोठे गुजराती व्यापारी आहेत. सचिन आणि अंजली यांना मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन ही दोन मुले आहेत.
वीरेंद्र सेहवाग व आरती अहलावत
वीरेंद्र सेहवागने एप्रिल २००४ मध्ये आरती अहलावतशी लग्न केले. आरती ही दिल्लीतील प्रसिद्ध वकील सूरज सिंह अहलावत यांची मुलगी आहे. आरती सध्या सेहवागच्या सर्व शाळा आणि क्रिकेट अकादमीची जबाबदारी सांभाळते.
गौतम गंभीर व नताशा जैन
गौतम गंभीर आणि त्याची मैत्रीण नताशा जैन यांनी ऑक्टोबर २०११ मध्ये एकमेकांशी लग्न केले. नताशाचे वडील रवींद्र जैन हे प्रसिद्ध कापड व्यावसायिक आहेत. नताशालाही व्यवसायात खुप रस आहे. गौतम गंभीरचे वडीलही मोठे उद्योगपती आहेत. वडिलांच्या भेटीपासून गौतम आणि नताशा एकमेकांच्या जवळ आले होते.
चेतेश्वर पुजारा व पूजा पाबरी
भारताचा स्टार कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने फेब्रुवारी २०१३ मध्ये पूजा पाबरीसोबत लग्न केले. पूजा एका श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातून आलेली आहे. त्यांच्या कुटुंबाचा कापडाचा व्यवसाय आहे. त्यांचे वडील गुजरातचे प्रसिद्ध कापड व्यापारी आहेत.
हरभजन सिंग व गीता बसरा
हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा ही बॉलीवूड अभिनेत्री तसेच इंग्लंडमधील प्रसिद्ध उद्योगपती राकेश बसरा यांची मुलगी आहे. हरभजन आणि गीता यांनी २०१५ मध्ये लग्न केले.
रोहित शर्मा व रितिका सजदेह
रोहित शर्माने २०१५ मध्ये रितिका सजदेहसोबत लग्न केले. रितिका एका श्रीमंत कुटुंबातील आहे. तिचे वडील बॉबी सजदेह हे मुंबईतील पॉश असलेल्या कफ परेड भागात राहतात. रितिकाचा भाऊ बंटी सजदेह हा सेलिब्रिटी मॅनेजर आहे. तर, रितिका स्वतः सुद्धा सेलिब्रिटी मॅनेजर आहे. तिने अनेक क्रिकेट स्टार्सची कामे केली आहेत.
रवींद्र जडेजा रिवाबा सोळंकी
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने एप्रिल २०१६ मध्ये रिवाबा सोळंकीशी लग्न केले. रिवाबा ही गुजरात काँग्रेसचे नेते हरिसिंग यांची भाची आहे. याशिवाय रिवाबाही भाजपशी संबंधित आहेत. तिचे वडील हरकेश सोळंकी यांच्या कुटुंबाची गणना प्रतिष्ठित कुटुंबांमध्ये केली जाते. रिवाबा ही व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनीअर आहे.
विराट कोहली व अनुष्का शर्मा
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे डिसेंबर २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकले. अनुष्का बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनुष्काचे माहेरचे कुटुंब अतिशय श्रीमंत आहे. तिचे वडील अजय कुमार शर्मा भारतीय वायुसेनेचे अधिकारी आहेत. तिची बहीण कर्णेश शर्मा मर्चंट नेव्ही अधिकारी आहे.