नाशिक – श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरिअल नॅशनल कमिटी, नवी दिल्ली, विजय नाना स्पोर्ट्स क्लब व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन संयुक्त रीत्या आयोजित महिला “ नाशिक प्रिमियर लीग २०२२ “ क्रिकेट स्पर्धेचे उपांत्य फेरीचे चित्र दुसर्या दिवशीच्या सामन्यांतर स्पष्ट आले आहे. दोन गटात विभागलेल्या सहा संघांचे प्रत्येकी दोन असे एकूण सहा सामने झाले असून , उपांत्य व अंतिम फेरीचे सामने २१ मे रोजी सकाळपासून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे रंगणार आहेत.
दुसर्या दिवशी चे दोन्ही सामने अतिशय चुरशीचे झाले. पहिल्या सामन्यात नाशिक फायटर्स ने नाशिक चॅम्प्स वर केवळ एक धावेने विजय मिळविला. या सामन्यात नाशिक फायटर्सच्या रसिका शिंदे व नाशिक चॅम्प्सच्या प्रिया सिंग या दोन्ही कर्णधारांनी अर्धशतके झळकवली.तर दूसर्या सामन्यात नाशिक सुपर किंग्स विरुद्ध नाशिक ब्लास्टर्स या संघात रोमहर्षक रित्या बरोबरी झाली. त्यामुळे खेळविण्यात आलेल्या सुपर ओवर च्या निर्णायक षटकात नाशिक ब्लास्टर्स ने ४ धावांनी बाजी मारली. या सामन्यात नाशिक सुपर किंग्सच्या तेजस्विनी बाटवाल ने ४४ धावा केल्या तर नाशिक ब्लास्टर्स च्या शाल्मली क्षत्रीय व गायत्री माळी प्रत्येकी ३ बळी घेतले व कर्णधार साक्षी कानडी ने सुपर ओवर मध्ये नाबाद १५ धावा केल्या.
उपांत्य फेरीचे सामने पुढीलप्रमाणे होणार आहेत :
१ – नाशिक फायटर्स वि. नाशिक सुपर किंग्स
२- नाशिक ब्लास्टर्स वि. नाशिक वॉरीअर्स
दुसर्या दिवशी च्या सामन्यांचे संक्षिप्त धावफलक व निकाल :
१- नाशिक फायटर्स वि नाशिक चॅम्प्स – नाशिक फायटर्स ८ बाद १३४- रसिका शिंदे ५१, कु.भवर ३ तर श्रुति गीते व प्रिया सिंग प्रत्येकी २ बळी वि नाशिक चॅम्प्स ६ बाद १३३ – प्रिया सिंग नाबाद ५१, अपूर्वा रोकडे २ बळी.
नाशिक फायटर्स १ धावेने विजयी.
२- नाशिक सुपर किंग्स वि नाशिक ब्लास्टर्स – नाशिक सुपर किंग्स ९ बाद ९६ – तेजस्विनी बाटवाल ४४, शाल्मली क्षत्रीय व गायत्री माळी प्रत्येकी ३ बळी व बिनबाद ११ वि नाशिक ब्लास्टर्स ७ बाद ९६ – ईशानी वर्मा १८ व गायत्री माळी १७. शाल्मली क्षत्रीय १४ . पुजा वाघ व ईव्हा भावसार प्रत्येकी २ बळी व बिनबाद १५ – साक्षी कानडी नाबाद १५.
बरोबरीनंतर सुपर ओवरच्या निर्णायक षटकात नाशिक ब्लास्टर्स ४ धावांनी विजयी.