मुंबई – विराट कोहली हा जगातला सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. परंतु कर्णधार म्हणून तो हुकूमशाही वृत्तीने वागला. रवी शास्त्रीला मार्गदर्शक म्हणून आणण्यासाठी अनिल कुंबळेसारख्या उत्तम खेळाडू आणि सज्जन माणसाला अपमानास्पद वागणूक दिली. कोहली-शास्त्रीने चार वर्षे मनमानी केली, परंतु कोहलीला कर्णधारपदावरून आणि शास्त्रीला मार्गदर्शक पदावरून अपमानास्पदरीत्या पायउतार व्हावे लागले. याविषयी परखड विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे