बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आशिया कप… भारत-पाक सामना आज… पाऊस पडल्यास काय होणार?

by India Darpan
सप्टेंबर 10, 2023 | 9:03 am
in इतर
0
F4 73hIawAEYE 9 e1694164089856

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगभरातील क्रिकेट शौकिनांचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याकडे लागले आहे. आशिया चषक स्पर्धेत हा सामना येत्या रविवारी, १० सप्टेेंबर रोजी होणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्याची दखल घेत आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १० सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार्‍या आशिया कपच्या सुपर-४ सामन्यासाठी नियम बदलले आहेत. तशी घोषणा एसीसीने केली आहे.

१० सप्टेंबर, रविवारी होणाऱ्या या सामन्यात पावसाने व्यत्यय आला तर हा सामना राखीव दिवशी पूर्ण होईल. यापूर्वी आशिया चषक स्पर्धेत सर्व नियमांमध्ये राखीव दिवस नव्हता. एसीसीने भारत-पाक सामन्यासाठी हा नियम जाहीर केला आहे.

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना रविवारी होणार आहे. २ सप्टेंबर रोजी दोन्ही संघांमध्ये गट फेरीत एक सामना खेळवण्यात आला होता, परंतु तो पावसामुळे रद्द करण्यात आला होता. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान सामना हा सुपर-४ मधील एकमेव सामना आहे ज्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. इतर कोणत्याही सुपर-४ सामन्यासाठी ही सुविधा उपलब्ध होणार नाही. याशिवाय १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. कोलंबोमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यातून सामन्यांचे यजमानपद काढून घेण्याचीही चर्चा होती. हे सामने हंबनटोटा किंवा दांबुला येथे हलवले जातील, असे मानले जात होते, परंतु तसे झाले नाही. आता आशिया चषकाचे उर्वरित सर्व सामने येथे खेळवले जातील.

Accuweather वेबसाइटनुसार, सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता ९० टक्के आहे. रात्री गडगडाटासह वादळाचीही शक्यता आहे. दिवसाच्या तुलनेत रात्री पावसाचा जोर वाढू शकतो. त्याची शक्यता ९६ टक्क्यांपर्यंत आहे. रात्रभर ढगाळ हवामान राहण्याची शक्यता ९८ टक्के आहे. Weather.com ने देखील पावसाची ९० टक्के शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोलंबोतील सामना रद्द झाल्यास हा सामना राखीव दिवशी होईल. राखीव दिवशीही निकाल कळला नाही, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागेल.

The Super 4s kicks off today, featuring the four qualifying teams, each set to compete against the others once. The ultimate showdown awaits on the 17th, as the top two teams will battle for supremacy in the final! ?

Tickets: https://t.co/xpP6Mc2t78#AsiaCup2023 pic.twitter.com/jEu70xELYY

— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 6, 2023

Cricket Asia Cup India Pakistan Match Rain ACC
Sports

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

फेसबुकवरील मैत्री महागात… शिक्षिकेची तब्बल १२ लाखांची फसवणूक…

Next Post

पोलिसांची माणुसकी; प्रसूतीच्या कळा सोसणाऱ्या महिलेला पोलिस वाहनातून रुग्णालयात केले दाखल

India Darpan

Next Post
IMG 20230910 WA0064

पोलिसांची माणुसकी; प्रसूतीच्या कळा सोसणाऱ्या महिलेला पोलिस वाहनातून रुग्णालयात केले दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011