नाशिक – नाशिक मध्ये झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात , हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब वर नाशिकने उस्मानाबाद वर ७ गडी राखून विजय मिळविला. अशा प्रकारे पाच साखळी सामन्यात ४ विजय मिळवत, नाशिकने अ गट विजेतेपद पटकाविले. नाशिकच्या उस्मानाबाद वरील विजयात फिरकीपटू प्रतीक तिवारी – सामन्यात ८ बळी व जलदगती ऋषिकेश कातकाडे – सामन्यात ६ बळी – यांची प्रभावी गोलंदाजी निर्णायक ठरली. त्यांना इतर गोलंदाजांची साथ मिळाली तर फलंदाजीत रविंद्र मत्च्या ४७ तसेच नीलकंठ तनपुरे व अथर्व चौधरी प्रत्येकी ३१ यांचे योगदान महत्वाचे ठरले. उस्मानाबाद तर्फे प्रसाद देशमुख ने ९५ धावा व ५ बळी अशी अष्टपैलू कामगिरी केली. .
इतर दोन सामन्यांत एन सी ए मैदानावर नंदुरबार ने रत्नागिरी ने विरुद्ध ९ गडी राखून विजय मिळविला. तो मुख्यत: सत्यम शिंदेच्या सामन्यातील एकूण १० बळींमुळे व मुकेश जाटच्या दोन्ही डावातील अर्धशतकांमुळे. तर महात्मा नगर क्रिकेट मैदानावर नांदेड ने पी डी सी ए विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळविले ते गुरुप्रसाद आलमखाने च्या ८६ धावांच्या जोरावर.
संक्षिप्त धावफलक व निकाल :
उस्मानाबाद विरुद्ध नाशिक :
उस्मानाबाद पहिला डाव – सर्वबाद १५१ – प्रसाद देशमुख नाबाद ९५ ,मुवाज शेख ४६. प्रतीक तिवारी ७ , ऋषिकेश कातकाडे , अथर्व चौधरी व प्रसाद दिंडे प्रत्येकी १ बळी .
नाशिक पहिला डाव – सर्वबाद १८१ – रविंद्र मत्च्या ४७, नीलकंठ तनपुरे ३१ , अथर्व चौधरी ३१, मुस्तांसिर काचवाला २४. प्रसाद देशमुख ५, देवराज बेदरे २ तर आदिनाथ पी व सिद्धांत जाधव प्रत्येकी १ बळी .
उस्मानाबाद दुसरा डाव – सर्वबाद ११७ – आदिनाथ पी ६८. ऋषिकेश कातकाडे ५ ,अथर्व चौधरी २ तर प्रसाद दिंडे व प्रतीक तिवारी प्रत्येकी १ बळी .
नाशिक दुसरा डाव – ३ बाद ८८ – आयुष ठक्कर नाबाद २०, रविंद्र मत्च्या नाबाद १६. सिद्धांत गिरी २ बळी.
नाशिक ७ गडी राखून विजयी.
रत्नागिरी विरुद्ध नंदुरबार :
रत्नागिरी पहिला डाव – सर्वबाद २०२ – पार्थ गांधी ६९, रिफात महारूफ ३७, साहिल मदार ३६. सत्यम शिंदे ३ ,मुकेश जाट व तन्मय शाह प्रत्येकी २ बळी .
नंदुरबार पहिला डाव -सर्वबाद १७५- मुकेश जाट ६९ , भूषण भामरे ३० .अविराज गावडे ४, साहिल मदार ३,अदनान शेख २ बळी .
रत्नागिरी दुसरा डाव – सर्व बाद १३६ – साहिल मदार ५७, पार्थ गांधी ३६. सत्यम शिंदे ७ बळी.
नंदुरबार दुसरा डाव – १ बाद १६६ – कृष्णा देवतरसे नाबाद ६६ , मुकेश जाट नाबाद ५६ , तनवीर सिंग ४०.
नंदुरबार ९ गडी राखून विजयी.
नांदेड विरुद्ध पी डी सी ए :
नांदेड पहिला डाव – सर्वबाद १८६ -गुरुप्रसाद आलमखाने ८६ , रीषभ शर्मा ४, आयुष भापकर ३ बळी.
पी डी सी ए पहिला डाव – सर्वबाद ११३ – सजय ३८, उत्कर्ष पचौरी २२. उमेश लकडे ४ तर खालिद शेख ,प्रवीण के व मिर्झा बेग प्रत्येकी २ बळी .
नांदेड दुसरा डाव – ९ बाद १६३ – शुभम लोहार ४९, गुरुप्रसाद आलमखाने ३१. रीषभ शर्मा ५, यश देशमुख ३ बळी.
पी डी सी ए दुसरा डाव – ५ बाद १२८ – यश देशमुख नाबाद ७२. खालिद शेख ४ बळी.
सामना अनिर्णीत. नांदेड ने पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळविले.