नाशिक – नाशिक मध्ये सुरू झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात , नाशिकने नांदेड वर १ डाव व १९५ धावांनी दणदणीत विजय मिळविला. नाशिकचा डावखुरा फिरकीपटू प्रतीक तिवारी याने पुन्हा एकदा भेदक गोलंदाजीने सामना गाजवत सामन्यात एकूण १२ बळी घेतले. व नांदेडला दोन्ही डावात ९७ धावात रोखले. तर सलामीवीर साहिल पारख ने तडाखेबंद १४१ धावा करत स्पर्धेतील दुसरे शतक झळकवले. मागच्या सामन्यातील शतकवीर रविंद्र मत्च्या ने ९० धावा केल्या. त्यामुळे नाशिकला ७ बाद ३८९ अशी मोठी, विजयी धावसंख्या उभारता आली.
इतर दोन सामन्यांत महात्मा नगर क्रिकेट मैदानावर रत्नागिरी ने उस्मानाबाद वर ९ गडी राखून विजय मिळविला. तो मुख्यतः श्रेयस जाधव च्या ९५ धावा , तसेच अदनान शेख चे सामन्यात एकूण १२ तर अविराज गावडे चे ८ बळी या गोलंदाजीतील प्रभावी कामगिरीवर . तर एन सी ए मैदानावर पी डी सी ए ने नंदुरबार विरुद्ध आघाडी घेत पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळविले.
संक्षिप्त धावफलक व निकाल :
नांदेड विरुद्ध नाशिक :
नांदेड पहिला डाव – सर्वबाद ९७ – शुभम लोहार ३४. प्रतीक तिवारी ६ , ऋषिकेश कातकाडे ३ व अथर्व चौधरी १ बळी .
नाशिक पहिला डाव – ७ बाद ३८९ डाव घोषित – साहिल पारख १४१ , रविंद्र मत्च्या ९०.
नांदेड दुसरा डाव – सर्वबाद ९७ – प्रतीक तिवारी ६ , नीलकंठ तनपुरे २ तर ऋषिकेश कातकाडे व अथर्व चौधरी प्रत्येकी १ बळी .
नाशिक १ डाव व १९५ धावांनी विजयी.
रत्नागिरी विरुद्ध उस्मानाबाद :
रत्नागिरी पहिला डाव – सर्वबाद २२५ – श्रेयस जाधव ९५. प्रसाद देशमुख ५ व सिद्धांत गिरी २ बळी.
उस्मानाबाद पहिला डाव – सर्वबाद ११५ – अदनान शेख ८ व अविराज गावडे २ बळी. फॉलो ऑन नंतर –
उस्मानाबाद दुसरा डाव – सर्वबाद १३४ – देवराज बेदरे ३६. अविराज गावडे ६ व अदनान शेख ४ बळी.
रत्नागिरी दुसरा डाव – १ बाद २६. रत्नागिरी ९ गडी राखून विजयी .
नंदुरबार विरुद्ध पीडीसीए :
नंदुरबार पहिला डाव – सर्वबाद १०९ – साहिल चव्हाण नाबाद २८, तन्मय शाह २३. रीषभ शर्मा ८ बळी.
पी डी सी ए पहिला डाव – सर्वबाद १३७ – संकेत मालकर ३७, मयुर गिड्डे ३२ . तनवीर सिंग ४ तर मुकेश जाट व सत्यम शिंदे प्रत्येकी २ बळी .
नंदुरबार दुसरा डाव – सर्वबाद २३७ – मुकेश जाट ८१, तनवीर सिंग ४६. रीषभ शर्मा ६ व यश देशमुख ३ बळी.
पी डी सी ए दुसरा डाव – ४ बाद १६३ – उत्कर्ष पचौरी ७९, मयुर गिड्डे ३३. सत्यम शिंदे ३ बळी .
सामना अनिर्णीत. पी डी सी ए ने पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळविले.