नांदेड चा ही निर्णायक विजय तर उस्मानाबाद लाआघाडीचे गुण
नाशिक – नाशिक मध्ये सुरू झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात , हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब वर नाशिक ने रत्नागिरी विरुद्ध १ डाव व ५१ धावांनी मोठा विजय मिळविला. तो मुख्यतः नाशिकच्या रविंद्र मत्च्या चे शतक व अथर्व चौधरीने फिरकीवर घेतलेले सामन्यात ७ बळी या कामगिरीवर. इतर दोन सामन्यांत महात्मा नगर क्रिकेट मैदानावर नांदेड ने नंदुरबार विरुद्ध ४ गडी राखून विजय मिळविला , तर एन सी ए मैदानावर उस्मानाबाद ने पी डी सी ए विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळविले.
संक्षिप्त धावफलक व निकाल : रत्नागिरी विरुद्ध नाशिक :
रत्नागिरी पहिला डाव – सर्वबाद ११७ – पार्थ गांधी २९,ऋषिकेश कातकाडे ४, कृष्णा केदार ३,प्रसाद दिंडे २ व अथर्व चौधरी १ बळी.
नाशिक पहिला डाव – सर्वबाद ३०२ – रविंद्र मत्च्या १००, मुस्तानसिर काचवाला ५२, सौरभ वाणी ४५. अदनान शेख ४ , सार्थक देसाई ३ व अविराज गावडे २ बळी.
रत्नागिरी दुसरा डाव – सर्वबाद १३४ – अविराज गावडे ५१. अथर्व चौधरी ६ बळी. प्रतीक तिवारी २ तर ऋषिकेश कातकाडे व नीलकंठ तनपुरे प्रत्येकी १ बळी.
नाशिक १ डाव व ५१ धावांनी विजयी.
उस्मानाबाद विरुद्ध पीडीसीए :
उस्मानाबाद पहिला डाव – सर्वबाद २२१ – प्रसाद देशमुख ६९, देवराज बेदरे ४७, सिद्धांत गिरी नाबाद ४७. रीषभ शर्मा ३ ,आयुष भापकर, अनुप भराडे व यश देशमुख प्रत्येकी २ बळी .
पी डी सी ए पहिला डाव – सर्वबाद १८८ – मयुर गिड्डे ९०. प्रसाद देशमुख ५ , आदिनाथ पी ३ व ऋषिकेश नेहारकर २ बळी .
उस्मानाबाद दुसरा डाव – ४ बाद १०१ – अनुराग कवडे ५४. आयुष भापकर २ व रीषभ शर्मा १ बळी.
सामना अनिर्णीत. उस्मानाबाद ने पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळविले.
नंदुरबार विरुद्ध नांदेड:
नंदुरबार पहिला डाव – सर्वबाद १६१ – प्रणव माने ६७. मुकेश जाट ३२, ओमकार काळे २२.आदित्य घोगरे ५ , उमेश लकडे २ बळी .
नांदेड पहिला डाव – सर्वबाद १४६ – गुरुप्रसाद आलमखाने ४६. तन्मय शाह ७, तनवीर सिंग २ बळी .
नंदुरबार दुसरा डाव – सर्वबाद १२४ – तनवीर सिंग नाबाद ४५, साहिल पाटील ३५ .खालिद शेख ५ तर शुभम लोहार २ बळी.
नांदेड दुसरा डाव – ६ बाद १४० – गुरुप्रसाद आलमखाने ४१. तन्मय शाह ४ बळी.
नांदेड ४ गडी राखून विजयी.