नाशिक – नाशिक मध्ये चालू असलेल्या, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर नाशिक ने स्टार ,पुणे विरुद्ध साहिल पारख च्या फटकेबाज १५१, लक्ष रामचंदानी १०२ व वेद सोनवणे चे सामन्यात ७ बळी यांच्या प्रभावी कामगिरी च्या जोरावर पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले. स्टार, पुणे ने अगदी थोडक्यात निर्णायक पराभव टाळण्यात यश मिळवले. इतर दोन सामन्यांत एन सी ए मैदानावर सातारा ने जालना विरुद्ध तर महात्मा नगर क्रिकेट मैदानावर पूना क्लब ने परभणी विरुद्ध निर्णायक विजय मिळवले.
संक्षिप्त धावफलक व निकाल :
स्टार, पुणे विरुद्ध नाशिक :
स्टार , पुणे पहिला डाव – सर्वबाद १३४( ५७.३ षटके) – प्रथमेश निगडे ४५ , करण कातकाडे ३ तर हुजैफ शेख, वेद सोनवणे व समकीत सुराणा प्रत्येकी २ बळी.
दुसरा डाव – ९ बाद १३७ ( ७० षटके) – आयुष पायगुडे नाबाद ४४, वेद सोनवणे ५ तर समकीत सुराणा व हुजैफ शेख प्रत्येकी २ बळी.
नाशिक पहिला डाव – २ बाद ३०६ (४९ षटके) डाव घोषित – साहिल पारख १५१, लक्ष रामचंदानी १०२.
सामना अनिर्णीत , नाशिक ला पहिल्या डावातील आघाडीचे गुण .
परभणी विरुद्ध पूना क्लब :
परभणी पहिला डाव – सर्वबाद १६६ – वेदांत शेडगे ७ बळी व दुसरा डाव – सर्वबाद ८९ – वेदांत शेडगे ३ बळी.
पूना क्लब पहिला डाव – सर्वबाद १७५ – अथर्व पाटील ५ तर ईश्वर राठोड ४ बळी व दुसरा डाव – १ बाद ६३.
पूना क्लब ९ गडी राखून विजयी .
सातारा विरुद्ध जालना :
सातारा पहिला डाव – ४ बाद ३३४ – संग्रामसिंह नारळे ८५, ओंकार गायकवाड ७६, अथर्व पवार नाबाद ५६, पुष्कर आवळकर ४३.
जालना पहिला डाव – सर्वबाद १२४ (२९.५ षटके) – ईशान जोशी ४ बळी. फॉलो ऑन नंतर ,
जालना दुसरा डाव – सर्वबाद २९ – अथर्व पवार ६ बळी.
सातारा एक डाव व १८१ धावांनी विजयी.