नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बांधकाम व्यवसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्था क्रेडाई च्या 2023 ते 2025 या दोन वर्षांच्या कालावधीसाठी असणाऱ्या राष्ट्रीय व राज्य कार्यकारणीची आज घोषणा करण्यात आली असून नाशिक चे सुनील कोतवाल यांची राज्य उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याच सोबत राष्ट्रीय क्रेडाई च्या कार्यकारणी मध्ये देखील नाशिक ला स्थान मिळाले असून क्रेडाई च्या राष्ट्रीय सल्लागार समिती ( घटना ) चे प्रमुख म्हणून जीतूभाई ठक्कर यांची फेरनियुक्ती करण्यात आली . त्याच सोबत उमेश वानखेडे यांची सह प्रमुख स्किल डेव्हलपमेंट व गौरव ठक्कर यांची क्रेडाई युथ आणि वुमन विंग चे राष्ट्रीय प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . राष्ट्रीय कार्यकारिणी च्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे तर राज्य कार्यकारणी च्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथे झालेल्या पदग्रहण समारंभात आपल्या पदाचा पदभार स्वीकारला ..
तीन दशकांपूर्वी नाशिक हून सुरू झालेल्या क्रेडाई आज देशभरात २१७ शहरात विस्तारली असून १३००० हून अधिक बांधकाम व्यवसायिक क्रेडाई सोबत जोडले आहेत . महाराष्ट्र राज्यात क्रेडाई विविध ६ झोन मधील सुमारे ६० शहरात विस्तारली असून सुमारे ३००० हून अधिक सदस्य या संस्थेशी जोडले आहेत .
मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार देणाऱ्या बांधकाम उद्योगात सुसूत्रता यावी, सर्व शासकीय कायद्याचे व नियमांचे पालन करून ग्राहक आणि व्यवसायिक यांच्या मध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यासोबतच उत्तम निर्माण कार्य व्हावे या साठी क्रेडाई कार्यरत आहे. बांधकाम व्यवसाया सोबत शहराचा समग्र विकास होण्यासाठी क्रेडाई स्थानिक प्रशासनासोबत नेहमीच सकारात्मक भूमिकेत असते . बांधकाम कामगारांचे कौशल्य विकास तसेच विविध शासकीय योजना त्यांच्या पर्यंत पोहोचाव्यात यासाठींदेखील क्रेदाई तर्फे नियमित उपक्रम राबविण्यात येतात.
Credai State National Body Nashik Builders Selection