नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित शेल्टर 2024 या प्रॉपर्टी प्रदर्शनाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे नाशिकच्या रियल इस्टेट उद्योगात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ नाशिकच्या अनेक उद्योगांना देखील होणार असल्याचे प्रतिपादन क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी केले. एका इमारतिचे निर्माण करताना सुमारे पन्नास हून अधिक विविध उत्पादनांचा वापर होतो आणि ती इमारत पूर्णत्वास गेल्यानंतर येथील रहिवाशांसाठी २० हून अधिक विविध सेवां व उत्पादनांची गरज असते .त्यामुळे रियल इस्टेट क्षेत्रातील सकारात्मक वातावरणामुळे एकूणच मार्केट ला बूस्ट मिळते असेही त्यांनी नमूद केले..
२० डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या प्रदर्शनाच्या पहिल्या ५ दिवसात सुमारे १०० बुकिंग झाले . याच सोबत प्लॉट्स तसेच बांधकामाला लागणाऱ्या अन्य साहित्यांच्या स्टॉलवर पण सकारात्मक प्रतिसाद असल्याचे दिसून येत असून प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक आकर्षक ऑफरची रेलचेल आहे.
बुधवारी समारोप
बुधवारी २५ रोजी या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून संध्याकाळी ५ वाजता समारोप कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे , अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोबत खा.राजाभाऊ वाजे,खा.शोभाताई बच्छाव, खा. भास्कर भगरे ,आ. छगन भुजबळ,आ.सीमा हिरे ,आ.देवयानी फरांदे ,आ.सरोज आहिरे ,आ.राहुल ढिकले,आ.राहुल आहेर व राष्ट्रीय क्रेडाई चे अध्यक्ष बोमन इराणी हे मान्यवर देखील कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
नाशिकचे ब्रॅण्डिंग सर्वदूर व्हावे तसेच सर्व सभासदांना प्लॅटफॉर्म उपस्थित व्हावा या उद्देशाने शेल्टर चे आयोजन करण्यात येते. प्रदर्शनाच्या यशामुळे हे दोन्ही उद्देश सफल झाले असल्याचे समन्वयक गौरव ठक्कर म्हणाले .प्रगतशील नाशिकमध्ये 1, 2 व 3 BHK सोबत स्टुडिओ अपार्टमेंट ते 8 BHK सदनिका निवासी व औद्योगिक प्लॉट, व्यावसायिक जागा, सीनियर सिटीजन हाऊसिंग असे अनेक पर्यायास शेल्टर मध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रदर्शनाचा निमित्ताने नाशिकची स्कायलाइन झपाट्याने बदलत आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली .कधीकाळी टुमदार बंगल्यांचे शहर असलेले नाशिक आता 40 हून अधिक मजल्यांची इमारत असलेले शहर होत असून अनेक आधुनिक सुविधा इमारतींमध्ये बांधकाम व्यवसायिक देत आहेत.असे शेल्टर २०२४ चे मार्गदर्शक दीपक बागड यांनी सांगितले.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजॉय गुप्ता, जयंत भातांब्रेकर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋशिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज खिंवसरा, अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, शामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सह समन्वयक सुशांत गांगुर्डे, वृषाली महाजन,सोनाली बागड हे विशेष सहकार्य करत आहेत.