बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

क्रेडाईच्या शेल्टरचा समारोप….१५००० कुटुंबांची भेट, १०० हून अधिक बुकिंग

by Gautam Sancheti
डिसेंबर 26, 2024 | 1:59 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20241225 WA0033 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -जगातील अनेक आघाडीच्या शहरांच्या उभारणी व प्रगती मध्ये रियल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगाचा मोठा हात आहे. विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी देखील देशातील विविध शहरांत कार्यरत क्रेडाई च्या सभासदांनी आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन राष्ट्रीय क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी केले.

20 ते 25 डिसेंबर दरम्यान क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे शेल्टर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्याच्या नगररचना विभागाच्या संचालक प्रतिभा भदाने, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते ,क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील,शेल्टर -2024 चे समन्वयक गौरव ठक्कर, शेल्टर -2024 चे मार्गदर्शक दीपक बागड, क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष जितुभाई ठक्कर, अविनाश शिरोडे, विजय संकलेचा, सुरेश अण्णा पाटील, सुनिल भाय भंग , किरण चव्हाण, उमेश वानखेडे, रवी महाजन हे मान्यवर उपस्थित होते.

बोमन इराणी पुढे म्हणाले की, प्रत्येकाचे स्वप्न आणि आठवणी प्रत्यक्षात आणण्यामध्ये बांधकाम व्यवसायिकांची मोलाची भूमिका असून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित शेल्टर 2024 या प्रदर्शनाची मांडणी अत्यंत विचारपूर्वक केली आहे. बांधकाम उद्योग हे मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे क्षेत्र असून शाश्वत विकासाची कास धरणे गरजेचे आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या नाशिकला उज्वल भविष्य असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

आरंभी स्वागत सहसचिव नरेंद्र कुलकर्णी यांनी केले. शेल्टर २०२४ चे मार्गदर्शक दीपक बागड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले..मनोज खिंवसरा यांनी आभार मानले .

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजॉय गुप्ता, जयंत भातांब्रेकर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋशिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, शामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सह समन्वयक सुशांत गांगुर्डे, वृषाली महाजन,सोनाली बागड यांनी विशेष सहकार्य केले.

“शेल्टर प्रदर्शन ऑनलाईन स्वरूपात मार्च 2025 पर्यंत – कृणाल पाटील
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील म्हणाले भविष्यातील नाशिक घडवण्यामागे क्रेडाई च्या सर्व माजी अध्यक्ष आणि सदस्य असलेल्या सर्व बांधकाम व्यवसायिकांचा मोलाचा वाटा आहे. या प्रदर्शनानंतर नाशिकची स्कायलाइन झपाट्याने बदलत आहे याची प्रकर्षाने जाणीव होत आहे. कधीकाळी टुमदार बंगल्यांचे शहर असलेले नाशिक आता 40 हून अधिक मजल्यांची इमारत असलेले शहर होत आहे. या इमारतींमध्ये असलेल्या सुविधा या ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि आवडीनिवडी यांचे प्रतिबिंब आहे . या प्रमाणे 1, 2 व 3 BHK सोबत स्टुडिओ अपार्टमेंट ते 8 BHK सदनिका निवासी व औद्योगिक प्लॉट, व्यावसायिक जागा, सीनियर सिटीजन हाऊसिंग असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. लॉजिस्टिक्स सेवा तसेच विविध क्षेत्रात अनेक नवीन ब्रँड्स नाशिकमध्ये येत आहेत. अन्य शहराच्या तुलनेमध्ये नाशिकमध्ये प्रॉपर्टी चे भाव तुलनात्मक दृष्ट्या कमी असल्यामुळे तसेच विविध क्षेत्रात अग्रेसर असल्याने नाशिक बाहेरील शहरातून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी नाशिकची प्राधान्याने निवड करत आहेत.यासोबतच शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने नाशिक मध्ये येणाऱ्या असंख्य नागरिकांची नाशिकमध्ये आपले घर घेऊन स्थायिक होण्याकडे कल असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. नाशिक ची वाढ ऑरगॅनिक वाढ असून शेल्टर प्रदर्शन ऑनलाईन स्वरूपात मार्च पर्यंत करणार असल्याची घोषणा पण त्यांनी केली .

१५००० कुटुंबांची भेट …१०० हून अधिक बुकिंग – गौरव ठक्कर
गेल्या ६ दिवसात १५००० कुटुंबांची भेट दिली असून १०० हून अधिक बुकिंग यात झाले आहे. ते पुढे म्हणाले की मोठ्या जागेमुळे हे प्रदर्शन अतिशय ऐसपैस होते .स्टॉलचा आकार तसेच स्टॉलच्या दोन रांगातील अंतर देखील प्रशस्त होते. यामुळे एकाच वेळेस शेकडो नागरिक प्रदर्शन स्थळी असून देखील नागरिकांना तसेच बांधकाम व्यवसायिकांना एक दुसऱ्याशी व्यवस्थित संवाद साधता आला . सर्वसमावेशक मार्केटिंग प्लॅन मुळे नाशिक आणि शेल्टर चे ब्रॅण्डिंग सर्वदूर करता आले. प्रदर्शनाचा लेआउट युवा वास्तु विशारद आर्कि. दिप्ती पाटील, आर्कि. ऋग्वेद जायखेडकर,आर्कि. कपिल साबळे यांनी वरिष्ठ वास्तुविशारद मिहिर मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली केला. दर दोन वर्षांनी होणारे शेल्टर हे प्रदर्शन मागील प्रदर्शनापेक्षा अधिक उत्कृष्ठ करण्याचा आमचा मानस या शेल्टर च्या यशाने सफल झाला असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

फडणवीस यांचे कर्तृत्व महाराष्ट्रात परिवर्तन घडवेल…केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास

Next Post

राज्यपालांच्या हस्ते ‘मोहम्मद रफी’ पुरस्काराचे वितरण…यांचा झाला सन्मान

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना जुने मित्र भेटेल, जाणून घ्या, बुधवार, २७ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 26, 2025
IMG 20250826 WA0402
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषद विकास निर्देशांकात राज्यात प्रथम…मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरव

ऑगस्ट 26, 2025
Untitled 44
संमिश्र वार्ता

३० महिला शेतकऱ्यांनी उच्च दर्जाची हिरवी मिरची पिकवून तब्बल ४० मेट्रिक टन उत्पादनची दुबईला केली निर्यात

ऑगस्ट 26, 2025
1 2 1 1024x682 1
संमिश्र वार्ता

नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ…इतक्या वेळात प्रवास होणार पूर्ण

ऑगस्ट 26, 2025
Corruption Bribe Lach ACB
संमिश्र वार्ता

वीजचोरी, प्रलंबित बिल, नवीन कनेक्शन व ५० हजाराची लाच…बघा, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं

ऑगस्ट 26, 2025
Pic 2 Unveiling of plaque at Epiroc groundbreaking ceremony at Nashik
राष्ट्रीय

एपीरॉकचे भारतात नवे उत्पादन व संशोधन केंद्र…नाशिकमध्ये ३५० कोटी रुपयाच्या प्रकल्पाचे केले भूमिपूजन

ऑगस्ट 26, 2025
img 4
संमिश्र वार्ता

वसई मधील ‘बविआ’च्या माजी नगरसेवकासह अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये….जळगाव जिल्हयातील शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश

ऑगस्ट 26, 2025
cbi
राष्ट्रीय

सीबीआयने एक लाख रुपयांची लाच घेतांना हेड कॉन्स्टेबलला केली अटक

ऑगस्ट 26, 2025
Next Post
मा राज्यापाल कार्यक्रम 4 1920x1643 1 e1735158766750

राज्यपालांच्या हस्ते ‘मोहम्मद रफी’ पुरस्काराचे वितरण…यांचा झाला सन्मान

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011