सोमवार, ऑगस्ट 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नम: नाशिक – प्रॉपर्टीचा महाकुंभ १४ ते १८ ऑगस्ट दरम्यान

by Gautam Sancheti
ऑगस्ट 11, 2025 | 7:12 pm
in स्थानिक बातम्या
0
Untitled 13

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रगतीशील नाशिकमध्ये स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.आणि याच स्वप्नाची पूर्तता करण्याची संधी क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे १४ ते १८ ऑगस्ट दरम्यान आयोजित नम: नाशिक – प्रॉपर्टीचा महाकुंभ या गृहप्रदर्शनात मिळणार असल्याचे प्रतिपादन क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी केले.ठक्कर डोम येथे होणाऱ्या या प्रॉपर्टी एक्स्पोचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न झाला.त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले भविष्यातील नाशिकसाठीच्या अनेक विकासात्मक योजनांमुळे सर्वांगाने आधीच महत्वपूर्ण असलेल्या नाशिकचे महत्व अजूनच वाढणार आहे .विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी तसेच राहणीमानाचा दर्जा यासोबतच उत्तम हवामान ,मुबलक पाणी यामुळे नाशिकमध्ये आज केलेली रिअल इस्टेट मधील गुंतवणूक भविष्यात ‘फायदे का सौदा ‘ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.प्रदर्शनाचे समन्वयक म्हणून ऋषिकेश कोते व नरेंद्र कुलकर्णी जबाबदारी सांभाळत आहेत.

याप्रसंगी प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते म्हणाले की,या प्रदर्शनामध्ये ८० हून अधिक विकसकांचे ५०० हून अधिक पर्याय उपलब्ध आहेत.यामध्ये शहरातील विविध भागातील फ्लॅट्स, प्लॅाट्स,दुकाने,ऑफिसेस यांचा समावेश आहे.यासोबतच आघाडीच्या गृहकर्ज देणाऱ्या संस्थादेखील प्रदर्शनात सहभागी होत आहेत.

प्रदर्शनाचे समन्वयक नरेंद्र कुलकर्णी म्हणाले की, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पायाभूत सुविधांमध्ये बरीचशी सुधारणा होणार असून नाशिक शहराची कनेक्टीव्हिटी देखील वाढणार आहे.रस्ते ,रेल्वे व हवाई सेवेद्वारे याआधीच नाशिक अन्य शहरांशी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. आगामी कुंभमेळ्यामुळे नाशिक हे अधिक प्रभावीपणे देशाशी व जगाशी जोडले जाईल. औद्योगिक ,शैक्षणिक ,धार्मिक व कृषिपूरक उद्योगाच्या अनेक संधी नाशिकमध्ये उपलब्ध असल्याने रोजगार व व्यवसायाच्या अनेक संधी नाशिकमध्ये असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा, आयपीपी कृणाल पाटील, उपाध्यक्ष उदय घुगे , अनिल आहेर, अंजन भालोदिया,कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव सचिन बागड, हंसराज देशमुख, एक्सपो कमिटीचे प्रमुख मनोज खिवंसरा, मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे , अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, सागर शाह, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शाह, वृषाली हिरे, दीपाली बिरारी, सहयोगी सदस्य सतीश मोरे, सुशांत गांगुर्डे, अभिषेक महाजन,समीर सोनवणे, मनोज लाडानी, हर्षल हणमंते,भूषण कोठावदे,शिवम पटेल, हिरेन भडजा, मयुरेश चौधरी,ऋषभ तोडरवाल, क्रेडाई युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर ,सह समन्वयक अजिंक्य नाहर हे विशेष सहकार्य करत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खरकटे पाणी फेकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचा परिचीताने केला विनयभंग

Next Post

कुठल्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार?…बघा संपूर्ण यादी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Indian Flag

कुठल्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार?…बघा संपूर्ण यादी

ताज्या बातम्या

trump 1

अमेरिकेने लावलेले आयात शुल्क व कापड निर्यात धोरण व सद्यस्थिती नेमकी काय आहे…

ऑगस्ट 11, 2025
mahavitarn

महावितरणच्या स्मार्ट टीओडी मीटरमुळे घरगुती ग्राहकांसाठी दिवसा स्वस्त वीजदर…या गोष्टी सुध्दा मोबाईलवर उपलब्ध

ऑगस्ट 11, 2025
Indian Flag

कुठल्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार?…बघा संपूर्ण यादी

ऑगस्ट 11, 2025
Untitled 13

क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नम: नाशिक – प्रॉपर्टीचा महाकुंभ १४ ते १८ ऑगस्ट दरम्यान

ऑगस्ट 11, 2025
rape

खरकटे पाणी फेकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचा परिचीताने केला विनयभंग

ऑगस्ट 11, 2025
NavyIXRB

मुंबईत विविध महत्त्वाच्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनी भारतीय नौदलाचा बँडचे सादरीकरण

ऑगस्ट 11, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011