नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये अनेक विकासपूर्वक कामे होणार असून यांमध्ये रिंग रोड , तसेच रस्ते , हवाई आणि रेल्वे सुविधांमध्ये भर पडणार आहे. नाशिक च्या बांधकाम व्यवसायिक यांची प्रतिमा देशभरात चांगली असून शहर विकास तसेच अनेक सामाजिक कार्यात क्रेडाई चे योगदान मोलाची असल्याचा सूर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मंत्री गिरीश महाजन यांनी काढला . ते क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नम: नाशिक – प्रॉपर्टीचा महाकुंभ या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
या प्रसंगी आ. सीमा हिरे , आ.राहुल आहेर, क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष गौरव ठक्कर, मानद सचिव तुषार संकलेचा , एक्स्पो चे समन्वयक ऋषिकेश कोते , नरेंद्र कुलकर्णी, आय पी पी कुणाल पाटील , एक्स्पो कमिटी प्रमुख मनोज खिवंसरा , उपाध्यक्ष उदय घुगे, अंजन भलोडिया , अनिल आहेर व मुख्य प्रायोजक दिपक बिल्डर्स अँड डेवलपर्स चे संचालक दिपक चंदे हे मंचावर उपस्थित होते .ठक्कर डोम येथे आयोजित हे प्रदर्शन १८ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले
आपल्या भाषणात महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले की शहराचा विकास हा पर्यावरण सांभाळून केला पाहिजे तसेच गोदावरी स्वच्छ ठेवणे हे महत्वाचे असून आजमितीला देखील गोदावरी पत्रात प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली .
आपले मनोगत व्यक्त करताना जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, नाशिक अध्यात्मिक आणि धार्मिक वारसा लाभलेली शैक्षणिक आणि पर्यटन तसेच उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे येणाऱ्या कुंभमेळ्यच्या निमित्ताने शहराची वेगळी ओळख तयार करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आले पाहिजे असेही त्यांनी आवाहन केले
या नंतर आपल्या मनोगतात क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष गौरव ठक्कर म्हणाले की नाशिक ची वाटचाल ग्लोबल सिटी कडे होत असून अशा एक्स्पो मध्ये भविष्यातील नाशिक ची झलक मिळते . उद्योग ,पर्यटन , शिक्षण आणि संस्कृती या चतु:सूत्री वर शासन ,प्रशासन आणि नागरिक यांच्या सहभागाने भविष्यातील नाशिक घडवण्याचा मानस देखील त्यांनी व्यक्त केला .
आपल्या स्वागत पर भाषणात समन्वयक नरेंद्र कुलकर्णी यांनी भविष्यातील नाशिकमधील संधींचा उहापोह केला त्या संधी अशा –
1)महिंद्राची नाशिकमधील गुंतवणूक
2) डिफेन्स हब म्हणून नाशिक मध्ये संधी
3) प्रस्तावित आयटी हब
4) दिंडोरी औद्योगिक क्षेत्रात येणारे रिलायन्स लाईफ सायन्सेस सारखे मोठे उद्योग
5) मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क मुळे संधी
6) 36000 स्क्वे. मीटर वर पसरलेले इंडियन ऑईलचा अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प
7) वाईन ,कृषी, ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यावरण पूरक पर्यटनाच्या संधी
8) नाशिक मध्ये लवकर सुरू होणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
9) आगामी कुंभमेळ्यासाठी शासनातर्फे पायाभूत सुविधांमध्ये करण्यात येणार असलेली गुंतवणूक.
नाशिकच्या वाढत्या कनेक्टिव्हिटीमुळे भविष्यात नाशिक महत्वाच्या सर्व शहरांशी प्रभावीपणे जोडले जाणार असून त्यामुळे आजच नाशिकमध्ये गुंतवणूक करावी असे उद्गार आपल्या मनोगतात समन्वयक ऋषिकेश कोते यांनी काढले. त्यांनी या वाढत्या कनेक्टिव्हिटीबाबत पुढील बाबींची माहिती दिली.
1) प्रस्तावित दिल्ली -मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर
2) प्रस्तावित नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वे
3) पूर्णत्वास गेलेला समृद्धी महामार्ग ज्याला नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी प्रवेश दिला गेला आहे
4) प्रस्तावित चेन्नई -सुरत एक्सप्रेस वे
5) प्रस्तावित नाशिक -वाढवण बंदर रस्ता
6)लोकल द्वारे नाशिक- मुंबई जोडले जाणे
प्रदर्शनाची वैशिष्ठे
१. पूर्ण वातानुकूलित डोम
२.प्रशस्त पार्किंग
३.विविध ऑफर्स
४.आकर्षक स्टॉल मध्ये ५०० हून अधिक पर्याय ..
५.एक्स्पो दरम्यान ग्रीन कुंभ 2025 या संकल्पने अंतर्गत विविध तज्ञांच्या विशेष चर्चासत्रांचे आयोजन
चर्चासत्रांची त्याची माहिती पुढीलप्रमाणे- चर्चासत्रांची वेळ- दु. 2 ते 5
दि-15 ऑगस्ट :विषय – स्मार्ट सिटी-स्मार्ट कुंभ
पहिले चर्चासत्र – -उज्वल भविष्यासाठी हरित जीवनशैली- वक्ता- गुरमीत सिंग अरोरा, राष्ट्रीय अध्यक्ष इंडीयन प्लंबिंग असोसिएशन , माजी अध्यक्ष इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिल
दुसरे चर्चासत्र – भविष्यातील स्मार्ट आणि पर्यावरणपूरक हरित शहरे , वक्ता -डॉ. अंशुल गुजराती-संस्थापक व संचालक इको सोल्युशन्स
दि-16 ऑगस्ट-विषय -शाश्वत शहर, शाश्वत कुंभ
पहिले चर्चासत्र – आधुनिक शहराची पर्यावरणपूरक व हरित विकासाची संकल्पना आणि डिजिटल प्रशासन,वक्ता- शेखर सिंग (आयएएस)- आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका
दुसरे चर्चासत्र -स्मार्ट, आणि शाश्वत पायाभूत सुविधांची उभारणी तसेच आधुनिक शहरे आणि संस्कृती यांचा समतोल ,वक्ता- राकेश भाटिया – इकोफर्स्ट
दि-18 ऑगस्ट –विषय – पर्यावरणपूरक कुंभमेळ्यासाठी संवेदनशील नियोजन
पहिले चर्चासत्र — स्वच्छ हवा, पाणी व जमिनीच्या संवर्धनासाठी कमी खर्चातील सुयोग्य पर्याय , वक्ता- अजित गोखले-संस्थापक -नॅचरल सोल्युशन्स
दुसरे चर्चासत्र -बांधकाम आणि पर्यावरणीय दृष्टीकोनातून नेट झिरो इमारतींची संकल्पना,वक्ता- ममता रावत-संस्थापक आणि सीईओ क्लायमेटनामा प्रा. लि.
या प्रसंगी आ. सीमा हिरे , आ.राहुल आहेर यांची देखील आपले मनोगत व्यक्त केले.. प्रसंगी माजी अध्यक्ष जितुभाई ठक्कर,सुरेश पाटील ,उमेश वानखेडे ,किरण चव्हाण,सुनील भायभंग
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा, एक्सपो कमिटीचे प्रमुख मनोज खिवंसरा, आयपीपी कृणाल पाटील, उपाध्यक्ष उदय घुगे , अनिल आहेर, अंजन भालोदिया,कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव सचिन बागड, हंसराज देशमुख, , मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे , अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, सागर शाह, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शाह, वृषाली हिरे, दीपाली बिरारी, सहयोगी सदस्य सतीश मोरे, सुशांत गांगुर्डे, अभिषेक महाजन,समीर सोनवणे, मनोज लाडानी, हर्षल हणमंते, भूषण कोठावदे, शिवम पटेल, हिरेन भडजा, मयुरेश चौधरी, ऋषभ तोडरवाल, क्रेडाई युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर , सह समन्वयक अजिंक्य नाहर हे विशेष सहकार्य करत आहेत.