नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे येथील ठक्कर डोम येथे आयोजित नम: नाशिक प्रॉपर्टीचा महा कुंभ या प्रदर्शनास मिळालेला उदंड प्रतिसाद नाशिकच्या अर्थकारणात नवचैतन्य आणणारा ठरणार असून येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हा एक सकारात्मक संकेत असल्याचे मत अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी व्यक्त केले.ते पुढे म्हणाले की इमारत निर्माणाधीन असताना जवळपास ४८ विविध उत्पादने व सेवांची गरज पडते तसेच ती इमारत पूर्णत्वास गेल्यानंतर तेथील रहिवाशांसाठी जवळपास २२ विविध सेवा लागतात. यामुळे अनेक प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होते . रिअल इस्टेट मधील प्रतिसाद मिळणे म्हणजे शहरासाठी सकारात्मक अर्थकारण हे एक समीकरण आहे असेही त्यांनी नमूद केले.
प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते म्हणाले की प्रदर्शनात अगदी १५ लाखापासून ते ४ कोटी हून अधिक किमतीच्या सदनिका उपलब्ध आहेत .तसेच सध्या गृह कर्जाचे दर तुलनात्मक दृष्ट्या कमी असून प्रदर्शनात देखील विविध ऑफर्स देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले .
प्रदर्शनाचे समन्वयक नरेंद्र कुलकर्णी म्हणाले की कधी काळी एक आणि दोन मजली टुमदार घरांचे नाशिक आता उंच उंच इमारती तसेच टाऊनशिपचे शहर होत आहे. यामध्ये विविध सोयी सुविधा देखील बांधकाम व्यवसाय देत आहेत .१४ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या प्रदर्शनाचा आज म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी समारोप होणार असून एका छताखाली असलेल्या ५०० हून अधिक पर्यायातून निवड करण्यासाठी आजच प्रदर्शनाला भेट देण्याचे त्यांनी आवाहन केले . प्रदर्शन स्थळी स्पॉट बुकिंग करणाऱ्यांना चांदी चा शिक्का भेट म्हणून देण्यात येत आहे अशीही माहिती त्यांनी दिली. या पैकी एक नाशिक च्या सौ .प्रतिभा ठाकूर यांना भेट देताना सोबत फोटो जोडत आहे.
समारोप संध्याकाळी सहा वाजता
आज होणाऱ्या समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम , महानगर पालिका आयुक्त मनिषा खत्री , पोलीस आयुक्त संदीप कर्णिक , नाशिक महानगर विकास प्राधिकरण आयुक्त माणिक गुरसळ उपस्थित राहणार आहेत
लकी ड्रॉ चे विजेते
प्रदर्शन कालावधीत भेट देणाऱ्यांपैकी भाग्यवंतांची लकी ड्रॉ द्वारे निवड झाली असून त्यांची नावे अशी
चंद्रकांत भारंभे ,शेजल संघवी ,दिनेश राठोड, प्रशांत शेलोळे ,चंद्रशेखर जोशी, चंदन लिहितकर, निलेश शहाकर ,हेमलता शाळके ,सागर ठोके, रुषिकेश धनवटे ,सुजाता कातकडे ,अजय मेहता, अमोल भोरसे
प्रदर्शनास दिपक बिल्डर्स अँड डेवलपर्स यांचे मुख्य प्रायो जकत्व लाभले असून प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा, एक्सपो कमिटीचे प्रमुख मनोज खिवंसरा, आयपीपी कृणाल पाटील, उपाध्यक्ष अनिल आहेर,उदय घुगे , अंजन भालोदिया,कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा,सहसचिव सचिन बागड,हंसराज देशमुख, मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे , अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, सागर शाह, निशित अटल, सुशील बागड, निरजन शाह, वृषाली हिरे, दीपाली बीरारी, सहयोगी सदस्य सतीश मोरे,सुशांत गांगुर्डे, अभिषेक महाजन,समीर सोनवणे, मनोज लाडानी, हर्षल हणमंते, भूषण कोठावदे, शिवम पटेल, हिरेन भडजा, मयुरेश चौधरी, ऋषभ तोडरवाल, क्रेडाई युवा विग समन्वयक आदित्य भातंबरेकर , सह समन्वयक अजिंक्य नाहर हे विशेष सहकार्य करत आहेत.
