रविवार, ऑगस्ट 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आजपासून क्रेडाईचा प्रॉपर्टी महाकुंभ …८० हून अधिक विकसकांचे ५०० हून अधिक प्रकल्प एकाच छताखाली

by Gautam Sancheti
ऑगस्ट 14, 2025 | 7:25 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 18

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– ८० हून अधिक विकसकांचे ५०० हून अधिक पर्याय एकाच छताखाली बघण्याची संधी आजपासून (14 ऑगस्ट) क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नम: नाशिक – प्रॉपर्टीचा महाकुंभ या प्रदर्शनात मिळणार असून या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मंत्री गिरीश महाजन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, अन्न आणि औषध प्रशासन, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार आहे.

याप्रसंगी खा. राजाभाऊ वाजे, खा. भास्कर भगरे, खा. शोभा बच्छाव, आ.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, आ.सरोज अहिरे, आ.राहुल ढिकले, आ.राहुल आहेर, आ. दिलीप बनकर, आ. सुहास कांदे, आ. हिरामण खोसकर, आ. नितीन पवार, आ. दिलीप बोरसे, आ.सत्यजित तांबे व माजी खा. हेमंत गोडसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. या प्रदर्शना बाबत अधिक माहिती देतांना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर म्हणाले की, 14 ते 18 ऑगस्ट दरम्यान नाशिकमधील ठक्कर डोम येथे आयोजित हे प्रदर्शन म्हणजे प्रगतीशील नाशिकमध्ये स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी असून भविष्यातील नाशिकसाठीच्या अनेक विकासात्मक योजनांमुळे सर्वांगाने आधीच महत्वपूर्ण असलेल्या नाशिकचे महत्व अजूनच वाढणार आहे . विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी तसेच राहणीमानाचा दर्जा यासोबतच उत्तम हवामान ,मुबलक पाणी यामुळे नाशिकमध्ये आज केलेली रिअल इस्टेट मधील गुंतवणूक भविष्यात ‘फायदे का सौदा ‘ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रदर्शनाचे समन्वयक म्हणून ऋषिकेश कोते व नरेंद्र कुलकर्णी जबाबदारी सांभाळत आहेत.

प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते –
शहराची प्रगती व अर्थकारण यामध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोलाचा वाटा असून एका गृह प्रकल्पामुळे अनेकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार तसेच व्यवसायाच्या अनेक संधी मिळतात .या प्रदर्शनात शहरातील विविध भागातील फ्लॅट्स, प्लाॅट्स,दुकाने,ऑफिसेस यांचा समावेश असून .यासोबतच आघाडीच्या गृहकर्ज देणाऱ्या संस्थादेखील प्रदर्शनात सहभागी होत आहेत.प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 असून विविध आकर्षक ऑफर्स साठी प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

प्रदर्शनाचे समन्वयक नरेंद्र कुलकर्णी-
आगामी कुंभमेळ्यामुळे नाशिक हे अधिक प्रभावीपणे देशाशी व जगाशी जोडले जाईल. अनेक प्रस्तावित पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे नाशिककडे येण्याचा ओघ निश्चितच वाढणार आहे. औद्योगिक ,शैक्षणिक ,धार्मिक व कृषिपूरक उद्योगाच्या अनेक संधी नाशिकमध्ये उपलब्ध असल्याने रोजगार व व्यवसायाच्या अनेक संधी नाशिकमध्ये आहेत.त्यामुळे आगामी कालावधीत घरांच्या किमती वाढू शकतात .त्यामुळे रियल इस्टेट मध्ये गुंतवणुकीसाठी सध्या अत्यंत योग्य व पोषक वातावरण आहे असेही ते म्हणाले.

प्रदर्शनास दिपक बिल्डर्स अँड डेवलपर्स यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले असून प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा, एक्सपो कमिटीचे प्रमुख मनोज खिवंसरा, आयपीपी कृणाल पाटील, उपाध्यक्ष उदय घुगे , अनिल आहेर, अंजन भालोदिया,कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव सचिन बागड, हंसराज देशमुख, , मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे , अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, सागर शाह, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शाह, वृषाली हिरे, दीपाली बिरारी, सहयोगी सदस्य सतीश मोरे, सुशांत गांगुर्डे, अभिषेक महाजन,समीर सोनवणे, मनोज लाडानी, हर्षल हणमंते, भूषण कोठावदे, शिवम पटेल, हिरेन भडजा, मयुरेश चौधरी, ऋषभ तोडरवाल, क्रेडाई युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर , सह समन्वयक अजिंक्य नाहर हे विशेष सहकार्य करत आहेत.

Screenshot 20250812 152256 Gallery
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यदिनी प्रतीक्षा यादीतील इतक्या उमेदवारांना मिळणार नियुक्ती आदेश

Next Post

येवला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारक बार्टीकडे हस्तांतरित करण्याचा शासनाचा निर्णय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
barti

येवला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारक बार्टीकडे हस्तांतरित करण्याचा शासनाचा निर्णय

ताज्या बातम्या

Gyj9FwXXMAAG8KV

भाजपने उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नावाची केली घोषणा…

ऑगस्ट 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 17, 2025
Untitled 31

निरोप समारंभादरम्यान गाणे सादर करणे तहसीलदाराला पडले महागात,तत्काळ निलंबित करण्याचे आदेश…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

TAIT..शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा उद्या निकाल

ऑगस्ट 17, 2025
Screenshot 2025 08 17 175747

राज्यात पुढील २४ तासासाठी या भागात रेड अलर्ट…

ऑगस्ट 17, 2025
Kia Carens Clavis 2

या कारमेकर कंपनीच्या ईव्‍हीने २१,००० बुकिंगचा टप्‍पा केला पार…

ऑगस्ट 17, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011