नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- क्रेडाई नाशिक मेट्रो या संस्थे तर्फे जनजाती कल्याण आश्रम (वनवासी कल्याण आश्रम) ला जवळपास १ लाख स्क्वेअर फूट फ्लेक्स उपलब्ध करून दिले असून याचा जनजाती बांधवांना-ग्रामस्थांना अनेक कामासाठी जसे अचानक-अवकाळी पाऊस आल्यास अन्नधान्य झाकुन ठेवण्यासाठी तसेच खळ्यात-मळ्यात वापरा साठी, पावसापासुन शेतीमाल झाकुन ठेवण्यासाठी, छतावर आवरण आदी साठी होतो असे प्रतिपादन जनजाती कल्याण आश्रम पश्चिम प्रांत चे अध्यक्ष डॅा. भरत केळकर यांनी केले .
हा उपक्रम म्हणजे क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे जन जाती बांधवांच्या छत्र आणि छाया यासाठी केलेली मोलाची मदत आहे असेही त्यांनी नमूद केले
याबाबत अधिक माहिती येताना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील म्हणाले की शेल्टर हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रॉपर्टी महोत्सव 20 डिसेंबर ते २६ डिसेंबर दरम्यान संपन्न झाला. या प्रदर्शनाला झालेल्या प्रतिसादामुळे एकूणच नाशिकच्या अर्थकारणात सकारात्मक संकेत मिळत आहेत. शेल्टर च्या प्रचारासाठी अनेक फ्लेक्स प्रिंट केले गेले. परंतु प्रदर्शन झाल्यानंतर त्या फ्लेक्सचे करायचे काय असा गहन प्रश्न असतो .परंतु वनवासी कल्याण आश्रम सोबत घेतलेल्या या उपक्रमाने या फ्लेक्सचा योग्य वापर झाला आहे असेही ते म्हणाले .
क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे नेहमीच नाशिक शहराच्या ब्रॅण्डिंग तसेच समाजातील सर्व घटकांसाठी भरीव कार्य केले असून या उपक्रमामुळे वापरलेल्या फ्लेक्स चा योग्य वापर तर झालाच पण सोबतच पर्यावरण संवर्धनासाठी देखील याने हातभार लागला असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी क्रेडाई नाशिक मेट्रो चे मानद सचिव गौरव ठक्कर ,उपाध्यक्ष दीपक बागड , सहसचिव नरेंद्र कुलकर्णी ,मॅनेजिंग कमिटी मेंबर विजय चव्हाणके, निरंजन शहा तसेच वनवासी कल्याण आश्रमाचे टोपले मामा , सुनील सावंत,श्रीकांत वाणी,महेश तुंगार ,संदीप साबळे ,विमल मडके व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.