नवी दिल्ली – माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आशिष येचुरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. तशी माहिती सीताराम येचुरी यांनीच ट्विटरद्वारे दिली आहे. आशिष यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि सर्व कोरोना योद्ध्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. आशिष यांचे वय ३५ वर्षे होते. ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. तरुण मुलाचे निधन झाल्याने सर्व स्तरातून सीताराम येचुरी यांना शोकसंदेश पाठविले जात आहेत. आशिष यांच्या पश्चात त्यांची पत्नी स्वाती, वडिल सीताराम येचुरी, आई इंद्राणी आणि बहिण अखिला असा परिवार आहे.
https://twitter.com/SitaramYechury/status/1385058250597408769