नाशिक – कार्यक्रमाला परवानगी हवी असेल तर त्यासाठी रीतसर अर्ज करा. प्रत्येक कार्यक्रमाला परवानगी दिली जाते असे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांनी मी कागदाला महत्व देतो. पोलिस आयुक्तांवर दबावतंत्र आणणे चुकीचे आहे. मी शहराला शिस्त लावायला आलो आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. गुढीपाडवा निमित्त नववर्षाच्या स्वागत यात्रेच्या परवाणीबाबत झालेल्या चर्चेवरुन ते बोलत होते. यावेळी त्यांनी परवाणकी का घ्यावी याबाबतही सविस्तर माहिती दिली.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासाठी महापालिका परवानगी घेत असते. स्थानिक स्वराज्य संस्थांना तेवढे अधिकार देण्यात आले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहर दंडाधिकारी यांची परवानगी घ्यावी असेही पोलिस आयुक्तांनी सांगितले. आपले शहर देशात एक नंबर झाले आहे. त्यात एकही अवैध बॅनर लागले नाही. निवडणुकीपर्यंत बॅनरचे आदेश आहेत. अर्ज दिल्यावर सात दिवसाच्या आत परवानगी दिली जावी असेही मत आयुक्त पांडे यांनी मांडले.