विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना प्रतिबंधक लसीच्या उपलब्धतेनुसार देशात लसीकरण मोहिम सुरू आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर किती असावे, याबाबत सरकारी पातळीवर बराच खल झाला. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर आधी ४५ दिवस आणि नंतर ८५ दिवस करण्यात आले. हे अंतर किती असावे याबाबत वेगवेगळे मत प्रवाह आहेत. कोविशिल्ड लस बनविणारी कंपनी एस्ट्राजेनेकाने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे.
भारतात कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२-१६ आठवड्याचे असावे याचा पुनरुच्चार कोरोना प्रतिबंधित लस बनविणारी कंपनी एस्ट्राजेनेकाने केला आहे. एस्ट्राजेनेका लसीच्या क्लिनिकल परीक्षणातील मुख्य संशोधकांनी सांगितले की, एका डोसमध्ये मिळणाऱ्या संरक्षणाचा स्तर लस घेतल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढतो.
प्रा. प्रोफेसर अँड्र्यू पोलार्ड एका मुलाखतीत सांगतात, दोन्ही देशात वेगवेगळ्या परिस्थितीमुळे ब्रिटेन आणि भारतातातील लसीकरणाच्या धोरणाची तुलना करता कामा नये. ऑक्सफोर्ड लसीच्या समुहाचे संचालक पोलार्ड म्हणाले, लवकरात लवकर अधिक संख्येतील लोकांना लसीचा कमीत कमी एक डोस द्यावा, हेच एका लसीकरणाच्या धोरणाचे लक्ष्य आहे. सध्याच्या परिस्थितीत ही बाब समजणे शक्य आहे.
ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठातील बाल संक्रमण आणि रोगप्रतिकारक शक्तीचे अभ्यासक प्रा. पोलार्ड सांगतात, एस्ट्राजेनेका एका डोसच्या लसीवर काम करत नाहीये. त्यांची कंपनी बूस्टर किंवा तिसऱ्या लसीच्या योजनेवर काम करत नाही. लसीच्या तुटवड्याच्या स्थितीत कमी लोकांना चांगले संरक्षण पुरविण्याऐवजी जास्तीत जास्त लोकांना संरक्षणाचे उपाय सुनिश्चित करणे कळते.
ब्रिटनमध्ये बहुतांश लोकसंख्येचे लसीकरण झाल्यानंतर दोन लसीच्या डोसमधील अंतर त्यांनी कमी केले आहे, असे पोलार्ड यांनी सांगितले.