पुणे – येत्या १ मेपासून सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लसीचा प्रत्येक डोस किती रुपयाला मिळणार हे अखेर स्पष्ट झाले आहे. सिरमने यासंदर्भातील माहिती पत्र प्रसिद्ध केले आहे. या माहिती पत्रकानुसार, सिरम इन्स्टिट्यूट राज्य सरकारला ही लस ४०० रुपये तर खासगी हॉस्पिटलमध्ये ६०० रुपयांना प्रत्येक डोस मिळणार आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारांना आता या डोसचे पैसे देण्याचे सांगितले आहे. त्यामुळे या लसीची किंमत नक्की किती राहणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर ते स्पष्ट झाले आहे.