इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेशी सामना करणाऱ्या सर्व राज्य सरकारांना दुसऱ्या लाटेत शहीद झालेल्या कोरोनायोद्ध्यांच्या कुटुंबीयांचा विसर पडला आहे. शहिदांचे कुटुंबीय आजही भटकत आहेत. सरकारकडून विचारणारे कोणीही नाही, असा आरोप कुटुंबातील सदस्य करत आहेत. डॉक्टरांना कोरोना ड्युटीदरम्यान संसर्ग झाल्यावर उपचाराचा खर्च देण्यात आलेला नाही. तर डॉक्टर शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीय किंवा पालकांना आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. मदतीसाठी ते भटकत आहेत. या भटकणाऱ्यांमध्ये परिचारिकांशिवाय इतर कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयसुद्धा आहे.
दिल्ली सरकारच्या लोकनायक रुग्णालयात काम केलेल्या माजी नर्सिंग अधिकारी राजकुमार अग्रवाल यांच्या पत्नी मीनल अग्रवाल सांगतात, ते लोकनायक रुग्णालयात काम करताना बाधित झाले होते. गेल्या दहा वर्षांपासून माझे पती या रुग्णालयात सेवा देत होते. गेल्या वर्षी कोरोना काळात माझ्या पतींनी अनेक कोरोनारुग्णांची सेवा केली होती. ते गेल्या वर्षी २९ एप्रिल रोजी ड्युटीदरम्यान संक्रमित झाल्यानंतर शहीद झाले होते. आता दोन लहान मुलांसह (८ आणि ५ वर्षे) मीना अग्रवाल एकट्या संघर्ष करत आहेत. त्यांनी दुसऱ्या परिचारिकांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्या सांगतात, पतीच्या निधनानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची सरकारी मदत मिळालेली नाही.
अशाचप्रकारे शहीद डॉ. अमित गुप्ता यांचे वडील सीताराम गुप्ता सांगतात, त्यांनाही सरकारकडून पूर्ण मदत मिळालेली नाही. डॉ. अमित गुप्ता कोरोना वार्डात ड्युटी करताना बाधित झाले होते. अनेक महिने उपचारासाठी भटकल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. उपचारावर संघर्ष करताना वडिलांवर अडीच कोटी रुपयांचे कर्ज उभे राहिले. एका ईसीजी चालवणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांच्या वेदना याहून अधिक आहेत. त्यांना सरकार कोरोनायोद्धा म्हणून मानत नाही. दिल्लीत या प्रकारचे अनेक कुटुंब उपचारादरम्यान शहीद झाले आहेत. ते आजही मदतीसाठी संघर्ष करत आहेत.