विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोणताही चोर शक्यतो आपल्या चोरीची कबुली सहसा देत नाही, परंतु एका चोराने मात्र १२ तासाच्या आतच आपल्या चोरीची कबुली देण्यासाठी स्वतः पोलीस स्टेशनला हजरी लावली. त्याच असे झाले की, रात्री साडे बाराच्या सुमारास नागरी रुग्णालयातून कोरोनाची लस चोरीस गेली, परंतु १२ तासांनंतर ती सापडली. कारण ज्याने चोरी केली त्यानेच लससह सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनमध्ये गाठले.
याबाबत पोलीसांनी सांगितले की, दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका दुचाकीस्वाराने सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याबाहेर असलेल्या चहाच्या टपरीजवळ बसलेल्या एका वृद्ध व्यक्तीला बॅग दिली आणि ती पोलिस ठाण्यात पोहचविण्यास सांगितले.
जेव्हा वयोवृद्धांनी बॅग पोलिस स्टेशनकडे नेली, तेव्हा पोलिसांनी ती उघडली आणि त्यात कोविड लस चोरीची असल्याचे त्यांनी पाहिले. बॅगमध्ये एक हस्तलिखित पत्र देखील होते ज्यामध्ये असे होते की, ‘सॉरी, मला माहित नव्हते की त्यात कोविड लस आहे’. यानंतर पोलिस बाहेर आले आणि त्या युवकाचा शोध घेतला असता तो सापडला नाही. त्यानंतर सफीदोन रोडच्या आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. तसेच त्याने परत केलेले अंदाजे अडीच लाख रुपयांची १७१० डोसच्या लसीचे डोस आता वाया गेले आहेत.
दरम्यान, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असलेल्या पीपी सेंटरमधून रात्री १७१० कोवडी लस चोरी झाली. सकाळी सफाई कर्मचारी पीपी सेंटरसमोर सफाई करत असताना ही घटना उघडकीस आली. यानंतर घटनेची माहिती मिळताच डॉ. बिमला राठी यांच्या निवेदनावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
डीएसपी जितेंद्रसिंग खटकर यांनी सांगितले की, सायबर, सीआयए आणि सिव्हिल लाइन पोलिस पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधात कार्यरत आहे. शहरातील संशयित ठिकाणी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला लवकरच अटक केली जाईल. मात्र कोरोना डोसचे औषध हे दोन ते आठ डिग्री तापमानात ठेवावे लागते. जेव्हा ते एका तासासाठी बाहेर असेल तर तेव्हा ते खराब होते. त्यामुळे हे औषध अधिकच खराब झाले आहे. त्याची किंमत सुमारे अडीच दशलक्ष रुपये आहे, असे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. रमेश पांचाळ यांनी सांगितले.