मुंबई – लस घेतली नाही तर काहीही होणार नाही, या भ्रमात राहणाऱ्यांनी आता सावध होण्याची आवश्यकता आहे. कारण लस घेतली नाही तर खूप मोठी चूक तुमच्या हातून होईल, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. विशेषतः कोरोनातून सावरल्यानंतर जर तुम्ही लस घेण्यासाठी टाळाटाळ करीत असाल तर ती घोडचूक ठरेल, असे या संशोधनात म्हटले आहे.
कोरोनातून सावरल्यानंतर लस घेतली नाही तर कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटचा धोका चारपटींनी वाढतो, असाही दावा करण्यात आला आहे. संशोधकांनी 12 महिन्यांपूर्वी कोरोना संक्रमित झालेल्या लोकांमध्ये अल्फा व्हेरियंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरियंटशी लढण्याची क्षमता चार पटींनी कमी होती. संशोधकांनी डेल्टाचा सामना करण्यासाठी दोन्ही डोज आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
कोव्हिशिल्ड किंवा फायजपचा एकच डोस घेऊन डेल्टा व्हेरियंटचा सामना करण्याचा विचार कुणी करीत असेल तर तो चुकीचा आहे. कारण एक डोस डेल्टाचा सामना करण्यासाठी केवळ 10 टक्के प्रभावी आहे. त्यामुळे दोन्ही डोस आवश्यक आहेत. ज्या लोकांनी दोन्ही डोज घेतले त्यांच्यातील 95 टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरियंटचा सामना करण्यासाठी प्रभावी अंटीबॉडीज होत्या. ब्रीटनमध्ये झालेल्या आणखी एका संशोधनात डेल्टाच्या विरुद्ध फायजर आणि बायोएनटेकच्या लशींचे दोन्ही डोस 80 टक्के प्रभावी असल्याचे आढळले आहे. तर कोव्हिशिल्डच्या दोन्ही डोजचा प्रभाव 60 टक्क्यांपेक्षा अधिक आढळला.
अल्फा, बिटा आणि डेल्टाचे संशोधन
संशोधनात केवळ एक डोज घेणाऱ्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर या नमुन्यांना कोरोनाच्या अल्फा, बिटा आणि डेल्टाच्या व्हेरियंटच्या विरुद्ध तपासण्यात आले. अल्पा व्हेरियंट सर्वांत पहिले ब्रिटनच्या केन्टमध्ये, बिटा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत आणि डेल्टा व्हेरियंट सर्वांत पहिले भारतात आढळून आला. संशोधनात असेही आढळून आले की केवळ एका डोजमध्ये पुरेश्या अँटीबॉडीज डेव्हलप होत नाहीत.