नवी दिल्ली – केंद्र सरकारने १ मेपासून कोरोना लसीकरणाच्या तिसर्या टप्प्याची घोषणा केली आहे. १८ वर्षांवरील सर्व लोकांना आता लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने आता खुल्या बाजारातही लशीची विक्री करण्यास मंजुरी दिलेली आहे. लशींच्या किमती पूर्वनिर्धारित असतील. त्याशिवाय राज्य सरकारला खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (१९ एप्रिल) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लशींचे उत्पादन करणार्या कंपन्या आता ५० टक्के पुरवठा पूर्वनिर्धारित किमतीनुसार राज्य सरकार आणि खुल्या बाजारात करू शकणार आहेत.









