नवी दिल्ली – प्रत्येक भारतीयांना सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क असून अशी संधी मिळावी, म्हणून प्रत्येक भारतीयांना लस देण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
राहूल गांधी यांनी सांगितले की, या लसीच्या आवश्यकतेबद्दल वाद किंवा युक्तिवाद करणे हास्यास्पद आहे. देशातील सर्व नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यात यावा. कारण प्रत्येक भारतीय सुरक्षित आयुष्य जगण्याच्या संधीस पात्र आहे. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने अमानुष वर्तन अस्वीकार्य आहे.
दरम्यान, राहूल गांधी आपल्या ट्विटसह इंदूरचा एक व्हिडिओ देखील अपलोड केला असून त्यात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिस रस्त्यावर एका व्यक्तीला मारहाण करीत आहेत. असे दिसून येते. राहूल गांधी म्हणाले की, कोरोना नियम पाळण्याच्या नावाखाली अशी लज्जास्पद आणि अमानुष वर्तन स्वीकारार्ह नाही. हिंदीमध्ये केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी जनतेवर पहारा करणारे पोलिस असे वागतात, तेव्हा सामान्य माणूस कुठे जाईल ? असा सवाल केला आहे.