अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोरोनाविरुद्धच्या लढ्याला पुढे नेत, भारतात बूस्टर डोअर किंवा पूर्वकल्पना डोस सुरू झाला आहे. आजपासून ही लस देशातील १८ वर्षांवरील लोकसंख्येला दिली जात आहे. कोरोनाव्हायरसचे नवीन ट्रान्समिसिबल XE प्रकार भारतात पसरल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, त्या पार्श्वभूमीवर बूस्टर डोस महत्त्वाचा मानला जात आहे.
यापूर्वी, केवळ आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक तिसऱ्या डोससाठी पात्र होते. कोविड १९ सावधगिरीचे डोस किंवा बूस्टर शॉट्स सर्व प्रौढांसाठी खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असतील. दरम्यान, सरकारी केंद्रांवर शासनाची मोफत लसीकरण मोहीमदेखील सुरु आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी ही मोहीम सुरू राहणार आहे.
बूस्टर डोस असा बुक करा
केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की लसीच्या डोससाठी CoWIN पोर्टलवर पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाले की लस घेतलेले सर्वच लाभार्थी आधीच CoWIN वर नोंदणीकृत आहेत. त्यामुळे COVID-19 बूस्टर डोस स्लॉट बुक करण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या पूर्व – नोंदणीकृत मोबाइल नंबरसह CoWIN पोर्टलवर लॉग इन करावे लागेल आणि पहिल्या आणि दुसऱ्या डोसच्या वेळी केलेली प्रक्रिया करुन फक्त स्लॉट बुक करा. तुम्ही तुमचे जवळचे लसीकरण केंद्र निवडू शकता आणि पोर्टलवर सोयीस्कर तारीख आणि वेळ बुक करू शकता
एवढे पैसे द्यावे लागतील
बूस्टर डोससाठी एकूण ३७५ रुपये मोजावे लागणार आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि भारत बायोटेक या आघाडीच्या लस उत्पादक कंपन्यांनी बूस्टर लसींच्या किमती कमी केल्या आहेत. नवीन किंमतीमध्ये लसीच्या डोससाठी २२५ रुपये आणि १५० रुपये सेवा शुल्क समाविष्ट आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी बूस्टर डोसच्या मुद्द्यावर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांसोबत शनिवारी सकाळी उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की खाजगी रुग्णालये लसीकरणासाठी प्रति डोस १५० रुपयांपेक्षा जास्त आकारू शकत नाहीत. तसेच आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी आणि ६० वर्षांवरील व्यक्तींना खाजगी लसीकरण केंद्रांवर पूर्वीप्रमाणेच मोफत बूस्टर डोस देणे सुरू राहील, परंतु त्यांना हवे असल्यास पैसे भरूनही लस खासगी केंद्रांवर घेता येईल, असेही ते म्हणाले. तसेच शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बूस्टर बडोसची व्याप्ती वाढवण्याची घोषणा केली होती. मंत्रालयाने सांगितले होते की, रविवारपासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीला देशातील खाजगी लस केंद्रांवर हा बूस्टर डोस दिला जाऊ शकतो.