नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. येत्या १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांना कोरोनाची लस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
देशाच्या अनेक भागात कोरोना थैमान घालत आहे. त्यास आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. त्यातही लसीचे दोन डोस घ्यावे लागतात. त्यातील अंतर २८ दिवसांचे आहे. त्यामुळे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या व्यक्तीच कोरोनापासून स्वतःचा बचाव करु शकतात. सध्याची कोरोना स्थिती लक्षात घेऊनच केंद्र सरकारने १८ वर्षांपुढील सर्वांसाठी कोरोना लस उपलब्ध करुन दिली आहे. सद्यस्थितीत ४५ वर्षांपुढील आणि गंभीर आजार असलेल्यांनाच कोरोना लस दिली जात आहे. भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींपाठोपाठ स्पुटनिक या रशियाच्या लशीला आणि त्यानंतर काही परदेशी लसींनाही मंजुरी दिली आहे. या सर्व लस मे अखेरीस भारतात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे मे आणि जूनपासून देशात लसीकरणाला मोठा वेग येणार असल्याचे चित्र आहे.
https://twitter.com/ANI/status/1384140696982941696