नाशिक – कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी एकूण 50 लाख 32 हजार 320 डोस प्राप्त झाले होते. त्यापैकी एकूण 48 लाख 43 हजार 943 नागरिकांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
नाशिक जिल्हा
नाशिक जिल्ह्याला एकूण 17 लाख 54 हजार 20 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 16 लाख 42 हजार 452 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 69 हजार 113 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 40 हजार 920 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 1 लाख 27 हजार 606 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 54 हजार 535 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 2 लाख 69 हजार 881 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 31 हजार 948 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 7 लाख 66 हजार 305 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 2 लाख 82 हजार 144 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्हा
अहमदनगर जिल्ह्याला एकूण 12 लाख 39 हजार 250 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 11 लाख 80 हजार 59 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 44 हजार 806 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 33 हजार 430 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 58 हजार 554 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 23 हजार 407 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 1 लाख 77 हजार 451 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 27 हजार 901 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 5 लाख 75 हजार 558 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 2 लाख 38 हजार 952 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्याला एकूण 6 लाख 27 हजार 40 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 6 लाख 17 हजार 209 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 16 हजार 950 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 10 हजार 480 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 31 हजार 731 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 11 हजार 119 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 1 लाख 59 हजार 255 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 18 हजार 303 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 2 लाख 68 हजार 751 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 1 लाख 620 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
जळगांव जिल्हा
जळगांव जिल्ह्याला एकूण 9 लाख 26 हजार 860 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 9 लाख 21 हजार 961 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 30 हजार 214 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 20 हजार 218 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 63 हजार 523 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 25 हजार 320 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 1 लाख 65 हजार 31 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 17 हजार 51 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 4 लाख 50 हजार 528 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 1 लाख 50 हजार 76 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्हा
नंदुरबार जिल्ह्याला एकूण 4 लाख 85 हजार 150 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 4 लाख 82 हजार 262 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 14 हजार 897 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 9 हजार 592 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 47 हजार 691 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 13 हजार 657 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 94 हजार 690 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 7 हजार 762 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 2 लाख 42 हजार 615 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 51 हजार 358 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
(स्त्रोत: उपसंचालक आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाची दि. 30 जुलै 2021 रोजीची माहिती)