नवी दिल्ली – अनेकांना लस घेतल्यानंतर कोरोनाची बाधा झाली आहे. परंतु यामुळे लसीकरण अयशस्वी ठरले, असे मानता येणार नाही. तज्ज्ञांच्या मते त्यांचे लसीकरण झाले नसते तर त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली असती किंवा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले असते. लसीकरणानंतर झालेला संसर्ग तीव्र स्वरूपाचा नसतो. रुग्ण लगेचच बरा होऊ शकतो.
केस स्टडी १
केजीएमयू लखनऊचे कुलगुरू प्रा. बिपिन पुरी यांना कोविड लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ११ दिवसांत कोरोनाची बाधा झाली. परंतु त्यांना फारच कमी लक्षणे होती. लस घेतल्यामुळे गंभीररित्या आजारी पडलो नाही, असे प्रा. पुरी यांचे म्हणणे होते.
केस स्टडी २
एसजीपीजीआय लखनऊचे संचालक डॉ. आर. के. धिमान आणि त्यांची पत्नी यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तरीही त्यांना मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली. त्यांना झालेला संसर्ग खूपच कमी होता. लस घेतल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नाही.
