मालेगाव – कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेतील हलगर्जीपणा येथील १० शिक्षकांना चांगलाच भोवला आहे. महापालिका आयुक्तांनी १० शिक्षकांना निलंबित केले आहे. संगमेश्वर परिसरात जुलै महिन्यामध्ये लसीकरण मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत मनपा शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली होती. या कामात शिक्षकांनी हलगर्जी केल्याची बाब उघड झाली आहे. नागरिकांनीच यासंदर्भात तक्रार केली. त्याची शहानिशा केल्यानंतर गंभीर प्रकार समोर आला आहे. जवळपास १३ नागरिकांना लस न देताच शिक्षकांनी प्रमाणपत्र दिल्याचे स्पष्ट झाले आहे. याची तत्काळ दखल घेण्यात आली असून १० शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे मनपा शिक्षकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.