लंडन – जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक देशात लॉकडाऊन लागलेला होता. अद्यापही काही प्रमाणात येथील लॉकडाऊन कायम आहे. आता पुन्हा एकदा कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने युरोपमधील अनेक देशात लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. ब्रिटनमध्ये देखील महिनाभरासाठी लॉकडाऊन कायम राहणार असल्याची शक्यता आहे.
कोरोना साथीच्या तिसर्या लाटेच्या भीतीमुळे ब्रिटनमधील लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याच्या योजना चार आठवड्यांसाठी पुढे ढकलल्या जाऊ शकते. ब्रिटन सरकार याचा गंभीरपणे विचार करीत आहे. वास्तविक २१ जूनपासून देशातील सर्व निर्बंध संपविण्याची योजना होती, परंतु कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने ही योजना संकटाच्या सापडली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. ब्रिटनमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ८,१२५ नवीन संक्रमण आढळले आणि १७ बळी गेले. आता अन्य देशाची स्थिती बघू या…
१) ब्राझील – सध्या ब्राझीलमध्ये नवीन रुग्ण प्रकरणांची नोंदविण्यात येत आहे. गेल्या 24 तासांत 85 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे आढळली. या दरम्यान, 2,216 बळी गेले. सलग पाचव्या दिवशी नवीन प्रकरणांमध्ये वाढ नोंदविण्यात आली.
२) पाकिस्तान – देशभरात सध्या 1,114 नवीन प्रकरणे आढळून आली आणि 57 मृत्यू झाले. तर येथे आतापर्यंत सुमारे नऊ लाख 40 हजार प्रकरणे आढळून आली असून 21 हजार 633 जणांचा मृत्यू झाला आहे.
३) इराण – गेल्या 24 तासांत नवीन घटनांची नोंद झाल्याने एकूण प्रकरणे 11लाख 9 हजारांवर गेली आहेत. या देशात एकूण 81 हजार 796 रूग्णांनी आपला जीव गमावला आहे.
४) तुर्की – येथे सध्या 2 ,611 नवीन संसर्गग्रस्त आढळले असून, आतापर्यंत रुग्ण संख्या 53 लाख 11 हजारांपेक्षा जास्त आहे. या देशात एकूण 48 हजार 593 मृत्यू झाले आहेत.
५) रशिया – रशियामधील नॅशनल टास्क फोर्सने म्हटले आहे की, गेल्या एका आठवड्यात देशात संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये सुमारे 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर मॉस्कोमध्ये त्यापेक्षा दुप्पट वाढ झाली आहे. आठवड्यापूर्वी मॉस्कोमध्ये कोरोना संसर्गाची 2,936 प्रकरणे होती, ती वाढून 6,701 झाली आहेत.
६) स्वित्झर्लंड – लसीकरण झालेल्या परदेशी पर्यटकांसाठी निर्बंध कमी करण्याची स्वित्झर्लंडची योजना आहे. डॉक्टरांनी नवीन मार्गदर्शन पाठविले आहे की, लसीकरण झालेल्या लोकांना आता घराच्या घरी मास्क घालण्याची आवश्यकता नाही.