नवी दिल्ली देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटाने हाहाकार उडालेला आहे. नागरिक भयभीत झालेले आहेत. परंतु या लाटेपासून बचाव करण्यासाठी काही नियम पाळल्यास कोरोनाचा संसर्ग होण्यास आळा बसू शकेल. तसेच आपल्यातील भीती कमी होईल. कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेकांना नेमके काय करावे हे उमजत नाही. खाली दिलेल्या काही गोष्टी तुमची मदत नक्कीच करू शकतील.
नवे लक्षणे आणि परिस्थिती
– ऐकण्याची क्षमता कमी होणे, ८ ते १२ दिवस १०२-१०३ डीग्री ताप येणे, उतरणे, घाम येणे, जुलाब, डोकेदुखी, डोळ्यांमध्ये जळजळ
– लहान मुलांनासुद्धा नव्या विषाणूची बाधा होत आहे. मुलांद्वारे मोठ्यांना लागण होण्याची शक्यता, आधी ही शक्यता नव्हती.
लसीकरण महत्त्वाचे
लसीकरणामुळे कोरोनाचा संसर्ग गंभीर रूप धारण करत नाही. ४५ वर्षांवरील सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. इतर वयाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर त्यांनीही त्वरित करून घ्यावे.
कोरोना चाचणी कथी करावी, कधी नाही
कोरोनाची लक्षणे ही लक्षणे दिसल्यास चाचणी करावी ः ताप, अंगदुखी, चव जाणे, वास न येणे, दम लागणे, डोळे लाल-गुलाबी होणे, कमी ऐकू येणे
संसर्ग झालेल्या लोकांशी संपर्कात आल्यास किंवा संबंधित व्यक्तीजवळ येऊन १० ते १५ मिनिटे राहिल्यास संसर्ग होऊ शकतो.
लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि लक्षणे नसलेल्यांची चाचणी करण्याची गरज नाही.
अहवाल आणि डाटा सिस्टिम स्कोर
अहवालात स्कोर एक ते पाच पर्यंत ठेवला जातो. त्यामध्ये एक म्हणजे संसर्ग नाही, २ म्हणजे संसर्ग आहे, परंतु कोविड नाही. स्कोर ३ म्हणजे कोविड होऊ शकतो. ४ म्हणजे कोविडसारखा संसर्ग आहे. आणि स्कोर ५ म्हणजे कोविड झाला आहे.
कोणती तपासणी करावी
आरटीपीसीआर- खात्रीलायक चाचणी
रॅपिड अँटिजेन टेस्ट- त्वरित निकाल देणारी
सिटी स्कॅन – जर आरटीपीआर किंवी अँटिजेन टेस्टमध्ये कोरोना झाल्याचे निष्पन्न न झाल्यास पण कोविडची लक्षणे आढळल्यास आणि तब्येत बिघडल्यास सिटी स्कॅन करावे
सिटी स्कॅन का- संसर्ग घशात न होता थेट फुफ्फुसात झाल्यास अनेक वेळा चाचण्यांमध्ये संसर्ग झाल्याचे निष्पन्न होत नाही.
तपासणी कधी करावी
विषाणूचा संसर्ग होण्यासाठी ५ ते ७ दिवसांचा कालावधी लागू शकतो. अशात संसर्गग्रस्ताच्या संपर्कात आल्यास त्वरित तपासणी केल्यास संसर्ग झाल्याची लक्षणे कदाचित दिसणार नाहीत. आरटीपीआरमध्ये निष्पन्न झाल्यास आणि निष्पन्न झाल्यास सिटी स्कॅन करण्याची गरज नाही.
संसर्गाची स्टेज ः ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्यांहून खाली आल्यास रुग्णालयात दाखल व्हावे.
स्टेज १ – लक्षणे ः ताप, खोकला, घसादुखी, नाक वाहणे, शिंका, उलटी, पोटदुखी आणि जुलाब.
काय करावे ः गृहविलगीकरणात राहावे, आधीच गंभीर आजार असतील तर रुग्णालयात दाखल व्हावे.
स्टेज २ – लक्षणे ः स्टेज १ च्या लक्षणांसह खूप ताप येणे, थकवा आणि खोकला. तसे झाल्यास त्वरित रुग्णालयात दाखल व्हावे.
स्टेज ३ – लक्षणे ः खूप ताप येणे, ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्यांहून खाली येणे.
काय करावे ः रुग्णालयात दाखल व्हावे, डॉक्टर आयसीयूत ठेवतील.
स्टेज ४- लक्षणे ः श्वास घेण्यास त्रास झाल्यास हृदय आणि शरीराचे भाग काम करणे बंद करू शकतात. मूत्रपिंडाला बाधा पोहोचू शकते.
काय करावे ः डॉक्टरांचा सल्ला घेऊन रुग्णालयात दाखल व्हावे. औषधोपचार घ्यावे.
१) रेमडेसिव्हिर ः उपयोग ः आपत्कालीन परिस्थितीत आणि ऑक्सिजनची पातळी ९० हून खाली आल्यास. संसर्ग थांबवण्याची किंवा मृत्यूपासून वाचण्याची खात्री नाही. बरे होण्याचा वेग वाढतो.
कोणासाठी उपयोगी ः सिटी स्कॅन अहवालात फुफ्फुसात संसर्ग आढळल्यास आणि ऑक्सिजन ९४ टक्क्यांहून खाली आल्यास.
२) फेविपिरावीर किंवा फेबिफ्लू
उपयोग ः आपत्कालीन स्थितीत, परंतु आरोग्य विभागाच्या आदेशात वापरण्याचा सल्ला नाही.
कोणासाठी उपयोगी ः संसर्ग झालेल्या रुग्णास खूप ताप आल्यास, श्वास घेण्यास त्रास होत असेल, १८ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांसाठी.
३) प्लाझ्मा थेरपी
उपयोग ः आपत्कालीन स्थितीत असल्यास, कमी संसर्गात उपयोगी
कोणासाठी उपयोगी ः १८ वर्षांहून अधिकच्या रुग्णांना आणि ऑक्सिजनची पातळी ९४ हून कमी असलेल्या रुग्णांसाठी.
हे लक्षात ठेवा…