नवी दिल्ली – मागील वर्षी मार्च-एप्रिल पासून जगभरात सुरू झालेला कोरोना संसर्गाचा ससेमिरा वर्षाअखेर कमी झालाला असतानाच पुन्हा यावर्षी फेब्रुवारी-मार्च मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली, एप्रिलमध्ये तर या लाटेने जणू काही कळसच गाठला आहे. विशेषत : भारतात कोरोनाच्या दुसरा लाटेमुळे संसर्गाचा विस्फोट झाला असून सर्वत्र मृत्यूचे तांडव सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र चितेंचे आणि भितीचे वातावरण दिसत आहे. मात्र आता कोरोनाची ही दुसरी लाट ओसरणार असल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत दुसरी लाट ओसरण्याची शक्यता एका संशाेधनाद्वारे वर्तविण्यात आली आहे.
‘क्रेडिट सुसे’ या संस्थेने यासंदर्भात संशोधन केले आहे. या संशाेधनानुसार, काेराेनाची दुसरी लाट जेवढ्या वेगाने वाढली, तेवढ्याच वेगाने ती ओसरू लागेल, असा अंदाज आहे. तसेच संशाेधनात असेही म्हटले आहे, की गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरपर्यंत देशातील २१ टक्के लाेकांमध्ये ॲन्टिबाॅडी विकसित झाले हाेते. तर एप्रिलमध्ये हा आकडा सुमारे ४० टक्क्यांपर्यंत जण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे दुसरी लाट कमी होण्यात लसीकरणाचीही माेठी भूमिका राहणार आहे. यापैकी १२ टक्के लाेकांमध्ये एप्रिलच्या अखेरपर्यंत लसीकरणाच्या माध्यमातून राेगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे सुमारे४० टक्के लाेकसंख्येमध्ये काेराेनाविराेधात राेगप्रतिकार शक्ती निर्माण झालेली असेल. अशा स्थितीत दुसरी लाट झपाट्याने ओसरू लागेल.
सदर संशाेधनानुसार, दुसऱ्या लाटेतील मुंबई मधील ९० टक्के रुग्ण उच्चभ्रू इमारतीतील आहेत. पहिल्या लाटेमध्ये या गटात केवळ १६ टक्के लाेकांमध्येच राेग्रप्रतिकारक शक्ती आढळून आली. त्या तुलनेत झाेपडपट्टीतील भागात ५७ टक्के लाेकांमध्ये प्रतिकार शक्ती आढळली हाेती. दुसऱ्या लाटेतही सर्व वयाेगटातील रुग्ण आढळून येत असल्याचेही निरीक्षण नाेंदविण्यात आले आहे. धोरणाची दुसरी लाट ओसरली तर पुन्हा सर्व व्यवहार पूर्ववत सुरळीत होतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे .