नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची संवाद यात्रा नाशकात आली आहे. याच यात्रेवेळी देवळाली मतदारसंघात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आमदार सरोज अहिरे आणि त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अति उत्साहात कोरोनाच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनीच केलेल्या फेसबुक लाईव्ह मधून ही बाब उघड होत आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहेत. तसे, राज्यात अद्यापही कोरोनाचे निर्बंध अद्यापही पूर्णपणे शिथील करण्यात आलेले नाहीत. अशा स्थितीत महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे बिनदिक्कतपणे कोरोना नियमांचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट होत आहे. याप्रकरणी पोलिस आता काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कोरोना नियमांचा फज्जा उडविणारा बघा हा व्हिडिओ