विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशावरील कोरोनाचा विळखा हळूहळू सैल होत आहे. अनेक राज्यांनी काही प्रमाणात निर्बंध शिथिल केलेले आहेत. काही ठिकाणी अनलॉक केले जाणार आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात येत असून, सोमवारपासून (७ जून) अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये बाजार, मॉल उघडले जाणार असून, लोकल मेट्रोसेवाही सुरू होणार आहे. राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी पाच पातळीवर योजना तयार करण्यात आली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर, ऑक्सिजन बेडची संख्या किती या आधारावर नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमांबाबत प्रत्येक गुरुवारी आढावा घेण्यात येणार आहे.
दिल्लीत सम-विषम पद्धत
दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या दिल्ली आपकत्कालीन व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत निर्णय जाहीर केले. अनलॉकच्या दुसर्या टप्प्यात सोमवारपासून बाजार आणि मॉल सम-विषम पद्धतीनुसार खुले होणार आहेत. दुकाने खुले करण्याचा क्रम मार्केट असोसिएशन ठरवणार आहे. मेट्रोसुद्धा ५० टक्के क्षमतेने चालणार आहेत. कोरोनाची परिस्थिती आणखी नियंत्रणात आल्यानंतर इतर सुविधाही लवकरच सुरू होतील, असे केजरीवाल म्हणाले.
दिल्लीत या गोष्टी सुरू
– बाजार, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स सकाळी १० ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील. गल्लीत, रस्त्याच्या बाजूची दोन-चार दुकाने रोज उघडण्याची परवानगी आहे.