विशेष प्रतिनिधी, नाशिक
कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे काही व्यक्तींना त्रास होतो तर काहींना बिल्कुल लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे किरकोळ स्वरुपाचा जरी त्रास होत असेल तरी त्याकडे दुर्लक्ष करु नका, असा सल्ला डॉक्टर देत आहेत. अनेकदा किरकोळ त्रासाकडे दुर्लक्ष केल्यानंतर काही दिवसांनी अचानक त्या रुग्णासा श्वास घेण्यास त्रास होतो. त्यानंतर ऑक्सिजन बेडची शोधाशोध केली जाते. मात्र, घरात, ऑफिसात किंवा हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्यावेळी नक्की काय करावे, हे अनेकांना माहित नसते. यासंदर्भात तज्ज्ञांनी काही व्यायाम सुचविले आहेत. जे केले असता रुग्णाची ऑक्सिजन पातळी वाढण्यात आणि श्वास घेण्यातील अडथळे नक्कीच दूर होऊ शकतात.
अधिक माहितीसाठी बघा खालील स्लाईडस