मुंबई – दीड वर्षांहून अधिक काळापासून जगभरातील सर्वच देशात सुरू असलेल्या कोरोना संसर्गामुळे मानवी समाजाचे प्रचंड नुकसान होत आहे. हे संकट लवकरात लवकर टळावे, असे सर्वांनाच वाटते. त्यामुळे कधीपर्यंत हे संकट राहणार? याची चिंता सर्वांनाच लागून राहिली आहे झाले आहे.
मुलांच्या अभ्यासापासून ते लोकांच्या कामापर्यंत, तसेच व्यवसायापासून ते नोकरीपर्यंत कोरोनाने सर्व क्षेत्रांवर गंभीर परिणाम केला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, कोरोना कधी संपणार? कोरोना नष्ट करण्यासाठी जगभरात लशीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. तथापि, काही अहवालांमध्ये असा दावा केला जात आहे की, लशी कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी आहेत, तर काही अहवालांमध्ये असे म्हटले जात आहे की, लशीकरणानंतर काही महिन्यांतच शरीरातील अँटीबॉडीजची पातळी कमी होऊ लागते.
कोरोना आता बराच काळ चालू राहणार आहे का? किंवा आता लोकांना जास्त काळजी करण्याची गरज नाही? असे प्रश्न विचारले जात आहेत. पुढील सहा महिन्यांत किंवा वर्षभरात जग कोरोनापासून मुक्त होण्याचा विचार काही लोक असतील तर ते योग्य नाही. कारण कोरोनाचा कहर इतक्या लवकर संपेल, असे शास्त्रज्ञ विचार करत नाहीत. त्यामुळे काही अहवालांमध्ये, असा दावा केला जात आहे की हिवाळ्याच्या सुरुवातीस कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक जगाच्या बहुतेक भागात दिसू शकतो.
याबाबत मिनेसोटा विद्यापीठातील संसर्गजन्य रोग संशोधन आणि धोरण केंद्राचे संचालक आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे सल्लागार मायकल ओस्टरहोम म्हणतात की, कोरोनाचे संकट इतक्या लवकर जगातून संपेल असे वाटत नाही. मात्र सध्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे, तसेचअनेक शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की वर्षाच्या अखेरीस, हिवाळा सुरू होताच, कोरोनाच्या प्रकरणांमध्ये आणखी एक वाढ होऊ शकते. तथापि, लसीकरणामुळे संसर्गाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
मायकल ओस्टरहोम म्हणतात की, कोरोनाची प्रकरणे कमी होताच व्यवसाय आणि शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. या सर्वांच्या दरम्यान, जगभरातील कोट्यवधी लोकांना अद्याप लशीकरण झालेले नाही. कोरोनाची नवीन रूपे समोर येत असताना, असे दिसते की, येत्या काही महिन्यांत कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढू शकतात. संसर्ग चालू राहू शकतो. परंतु लसीकरणाचा वेग वाढवून संसर्गाचा दर कमी केला जाऊ शकतो. तथापि, आपल्या आजूबाजूला नेहमीच असे काही लोक असतील त्यामुळे संक्रमणाचा धोका राहू शकतो.
सामान्यतः कोरोनाचा हा कहर किती महिने किंवा वर्षे सुरू राहील याबद्दल स्पष्टपणे सांगता येत नाही, मात्र निश्चितपणे सांगितले जाऊ शकते की, कोरोना या क्षणी संपेल असे वाटत नाही. तसेच पुढील काही महिने कठीण असतील, असेही मायकेल ओस्टरहोल्म म्हणतात. इतक्या लवकर कदाचित जोपर्यंत सर्व लोकांना लशीपासून संरक्षण मिळत नाही, किंवा सर्व लोकांना कोरोना संसर्ग होत नाही, तोपर्यंत तो कायम राहील.