हैदराबाद – देशात कोरोना विषाणूचे थैमान सुरू असतानाही आंध्र प्रदेशातील कुर्नुल जिल्ह्यातील कैरुप्पाला गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनाच्या निर्बंधांची पायमल्ली करीत हजारो गावकरी एकत्र आले. दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या पिडकल वॉर (शेणाचे गोळे एकमेकांवर फेकण्याचा उत्सव)साठी जमले. या उत्सवात गाव दोन गटात विभागले जाते. दोन्ही गट एकमेकांवर शेणाच्या गोळ्यांचा तुफान मारा करतात. कोरोनाच्या संकटात हा उत्सव रद्द होणे आवश्यक होते. मात्र, कुठलीही पर्वा न करता हजारो ग्रामस्थ जमले आणि त्यांनी हा उत्सव साजरा केला. दरम्यान, हा उत्सव कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता वर्तविली जाते. याप्रकरणी आता सरकार आणि प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बघा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1382637426158362624