नवी दिल्ली – ‘नावात काय आहे ? असे म्हटले जाते. परंतु ‘नावातच सर्व काही आहे.’ अशा प्रकारचा विचार देखील मांडला जातो. कारण नावासाठी सर्वजण त्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. परंतु काही वेळा नाव सुद्धा वादग्रस्त ठरत असते. मग ते कोणतेही नाव असो एखाद्या शहराचे किंवा संस्थेचे असो. परंतु विषाणूचे नाव वादग्रस्त ठरू शकते ?
होय , कारण जगभरात सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराची चर्चा सुरू आहे, हा प्रकार किती संसर्गजन्य आहे, संसर्ग कोणत्या देशांमध्ये पोहोचला आहे, तसेच सध्याची लस त्याविरूद्ध किती प्रभावी असू शकते, अशी चर्चा सुरू असतानाच आता हा प्रश्न नवीन प्रकाराच्या विषाणूच्या नामकरणाबाबत आहे. जागतिक प्रसारमाध्यमांच्या काही विभागांमध्ये अशी चर्चा आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराला प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळे असे नाव दिले आहे.
‘नु’ आणि ‘शी’ ही अक्षरे
एका अहवालानुसार, WHO ने दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नवीन कोरोना प्रकाराचे नाव देताना ‘Xi’ (इंग्रजी वर्णमालाचे X आणि I असलेले अक्षर) वापरलेले नाही. या प्रकारकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नावासारखे नाव न देण्याचा डाव म्हणून पाहिले जात आहे.
नामकरणाची व्यवस्था
कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारांना नाव देण्याच्या प्रणाली अंतर्गत, WHO ग्रीक वर्णमाला, जसे की अल्फा, बीटा, गामा इत्यादी अक्षरे क्रमाने देऊन कोरोनाच्या प्रकारांना नावे देत आहे. या क्रमात, शेवटचा प्रकार डेल्टा होता, जो अत्यंत धोकादायक ठरला. या नियमानुसार, कोरोनाच्या नवीन प्रकाराचे नाव ग्रीक वर्णमालेतील ‘नू’ (एन आणि यू) च्या पुढील अक्षरावरून ठेवायला हवे होते, परंतु डब्ल्यूएचओने केवळ ‘नु’ नाही तर त्याचे पुढील अक्षर ‘Xi’ (एक्स आणि आय) सोडले. यातूनच चर्चच्या फेऱ्या सुरू झाल्या.
नाव कसे दिले?
कोरोनाच्या नवीन प्रकाराची म्हणजे B.1.1.529 विषाणूची माहिती मिळताच वैद्यकीय जगतातील अनेकांना वाटले की, WHO त्याचे नाव Nu ठेवेल. कारण हे ग्रीक वर्णमालेचे अनुक्रमे पुढील उपलब्ध अक्षर होते, परंतु तसे झाले नाही. डब्ल्यूएचओने ‘नू ‘ नंतर आलेल्या ‘शी ‘ अक्षराला देखील स्पर्शही केला नाही, तर वरिष्ठ तत्ज्ञां झालेल्या बैठकीत नवीन प्रकार ओमिक्रॉनचे नाव दिले.
WHO ने दिले स्पष्टीकरण
या संदर्भात डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘नू’ या अक्षरामुळे गोंधळ होण्याची शक्यता असल्याने घेतलेले नाही. ‘शी ‘ निवडले गेले नाही कारण ते लोकप्रिय आडनाव आहे. त्यामुळे आमचे नामकरण धोरण हे स्पष्ट करते की, नागरिकांकडून लक्ष्य किंवा द्वेष केले जाण्याच्या भीतीने व्यक्ती, ठिकाणे, प्राणी इत्यादींची नावे निवडली जाणार नाहीत. मात्र येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की जगातील अनेक देश चीनवर कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याचा आरोप करत आहेत की हा विषाणू तिथल्या वुहान शहरातील प्रयोगशाळेतून निर्माण झाला आहे.