विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर १४ दिवसांपर्यंत रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात येते. तसेच त्यांचा निगेटिव्ह अहवाल येण्यासाठी पुन्हा कोरोना तपासणी करणे आवश्यक असते. परंतु काही तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, १४ दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण केल्यानंतर, सौम्य आणि सामान्य लक्षणे असलेल्या लोकांची पुन्हा चाचणी घेण्याची आवश्यकता नाही.
मुंबईचे डॉ. संदीप पाटील म्हणतात की, अनेक अभ्यासांनुसार शास्त्रज्ञ असा दावा करतात की, सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांमध्ये सातव्या किंवा आठव्या दिवशी विषाणू नष्ट होतो. यावेळी हा संसर्ग इतर कोणामध्येही पसरत नाही, परंतु शरीरात मृत विषाणूची उपस्थिती आरटी-पीसीआरने शोधली जाते, त्यामुळे अहवाल पॉझेटिव्ह येतो.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, सौम्य, सामान्य आणि लवकर लक्षणे असलेल्या रूग्णांना लक्षणांनंतर दहा दिवसानंतर सोडण्यात येते. परंतु गेल्या तीन दिवसांपासून सतत ताप येत नाही ना हे बघावे लागते. अशा परिस्थितीत रुग्णाला त्रास होण्यापूर्वी आरटी-पीसीआर तपासणीची आवश्यकता नसते. परंतु अशा रुग्णांनी सावधगिरी बाळगून स्वत: ला वेगळे ठेवले पाहिजे आणि सात दिवस निरीक्षण करावे.
केजीएमयूच्या फुफ्फुसीय क्रिटिकल केअर युनिटचे डॉ. वेद प्रकाश स्पष्ट करतात की, संसर्गानंतर रुग्णाला तंदुरुस्त वाटत असेल तरच सोडण्यात येईल. तसेच आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह देखील आवश्यक आहे. सौम्य किंवा सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी सरासरी चौदा दिवस लागतात. गंभीर संक्रमण असलेले थोडा जास्त वेळ घेऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीस निरोगी होण्यासाठी वेगवेगळा वेळ लागू शकतो.