विशेष प्रतिनिधी, मुंबई
आजच्या काळात प्रत्येक पालकांची फक्त एकच तक्रार असते की, कोरोनामुळे शाळा सुरू नसल्याने आपली मुले तासनतास टिव्ही समोर असतात किंवा मोबाईलवर चिकटलेले असतात. घरात बसलेल्या मुलांना लागले हे मोबाइल आणि टीव्हीचे व्यसन आरोग्याचे नुकसानकारक असून त्यावर मात करण्याचे मार्ग काय आहेत.
आज सोशल मीडिया प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला इतकेच नव्हे तर ते व्यसन बनले आहे. त्यामुळे एखादी व्यक्तीची इच्छा असली तरी देखील ती या व्यसनातून मुक्त होऊ शकत नाही. जेव्हा आई – वडील यांनाच मोबाइल, टीव्हीचे व्यसन लागले आहे, हे पाहिल्यानंतर मुले ही तसेच सुरुवात करतात, तेव्हा ही समस्या अधिकच वाढते. त्यामुळे आपल्या मुलाच्या विकासावर सोशल मीडियाचा कसा प्रभाव पडतो हे पालकांना माहित असणे आवश्यक आहे. मुलांनी बराच काळ मोबाइल आणि टीव्हीवर वेळ घालवल्यास त्यांच्या मनावर खोल परिणाम होऊ शकतो. सोशल मिडीयावर जास्त वेळ घालवण्याचे तोटे काय आहेत, तसेच मुलांची या कथीत व्यसनातून कशी मुक्त होऊ शकतात.
इंटरनेटचे ५ दुष्परिणाम
मानसिक बदल – हल्ली मुले काही तास मोबाईल फोनवर गेम खेळत असतात. काही काळ फोन त्यांच्यापासून दूर नेल्यास त्यांचा राग आणि चिडचिडेपणा दर्शविणे सामान्य झाले आहे. सोशल मीडियावरील हे व्यसन त्यांच्यात मानसिक बदलांचे लक्षण मानले जाऊ शकते. सोशल मीडिया इतका मोठा आहे की मूल कोठे, केव्हा आणि कसे माहिती घेते. यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे मुले अश्लील किंवा हानिकारक वेबसाइट्सच्या संपर्कात येऊ शकतात.

नैराश्याचे मुख्य कारण – काही लोक इंटरनेटचा जास्त वापर करतात, त्यांना नैराश्य येण्याचे सर्वाधिक धोका असते. आता ही समस्या विद्यार्थी आणि किशोरवयीन मुलांमध्ये अधिक जाणवत आहे. अस्वस्थता आणि त्यांची रोजची कामे न होणे अशा समस्या या लोकांमध्ये दिसून येते. लहान वयात काही मुले चांगल्या आणि वाईट दरम्यान फरक करू शकत नाहीत तसेच सोशल मीडिया सहजपणे त्यांची विचारसरणी आणि वागणूक बदलू शकते.
निद्रानाशचे बळी – आजच्या काळात इंटरनेट लोकांमध्ये निद्रानाशाचा आजार पसरवत आहे. मुले असो किंवा प्रौढ व्यक्ती असो मोबाइलच्या व्यसनांमुळे, त्यांना रात्री मोकळा वेळ मिळाला की, ते सोशल मीडिया ब्राउझ करणे अधिक पसंत करतात. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि येथून त्या व्यक्तीला निद्रानाश सुरू होतो.
वेळेचा गैरवापर – काही मुले तासन्तास मोबाईलवर असतात, त्यामुळे त्याचे मोबाईलवर अनेक तास वाया जातात हे देखील माहित नसते. सहाजिकच त्यांच्याकडे अभ्यासासारखी महत्वाची गोष्ट करण्यास पुरेसा वेळ नसतो.
इंटरनेट व्यसन – इंटरनेट व्यसन एखाद्या व्यसनापेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्याने एखादी व्यक्ती आपली मानसिक संतुलन गमावते. त्यामुळे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयी त्यांना माहिती नसल्यामुळे ते स्वतःच्या जगात व्यस्त राहितात. याचा थेट मानसिक स्थितीवरच परिणाम होतो, तसेच वैयक्तिक आयुष्यातही त्याचे संबंध कमकुवत होऊ लागतात.
…….
मुलांचे मोबाइल-टीव्ही व्यसन दूर करण्यासाठी हे करा
१) मोबाइल आणि टीव्हीच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी पालकांनी मुलांसमवेत थोडा वेळ घालविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपल्या मुलांना बरे वाटेल आणि त्यांचा मेंदू देखील चांगले विकसित होईल.
२) पालक त्यांच्या मुलास जवळ बसून चांगल्या गोष्टी, चांगले शैक्षणिक चित्रपट, कथा, धार्मिक गोष्टी इत्यादी दर्शवू शकतात. यामुळे मुलाच्या वागणुकीत बदल होऊ शकतो.
३) मुलाचा मोबाइल पाहण्यासाठी एक वेळ निश्चित करा. त्यामुळे त्याचा कमीतकमी वेळ मोबाईलवर वाया जाईल. तसेच संपूर्ण वेळ स्वत: मोबाईलवर घालवू नका. असे केल्याने मुलाला असे वाटेल की आपण त्याला सक्ती करीत आहात.








