विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना साथीच्या संदर्भात दिलेल्या आदेशानंतर केंद्र सरकारने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना प्रत्येक खेड्यातील आशा कर्मचार्यांना खोकला-ताप-रूग्णांची ओळख पटविण्याचे व त्यांचे सर्वेक्षण (निरीक्षण) करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, कोविड विशेष रूग्णालये, उप रुग्णालये, उप आरोग्य केंद्रे आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांवर आशा कार्यकर्त्याची नियुक्ती करावी, तसेच जिथे संक्रमित व्यक्तींवर उपचार केले जातात, तेथे सामुदायिक आरोग्य अधिकारी यांना फोनवरून रुग्णांना पहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आशा कार्यकर्त्याना जलद आरोग्य चाचणी प्रशिक्षण घेण्यासही सांगितले गेले आहे. कारण हळूहळू कोरोनाचा प्रसार ग्रामीण आणि आदिवासी भागातही दिसून येत आहे, त्याकरिता कोरोना उपचार केंद्रे आणि वेगळ्या खोल्या बांधल्या पाहिजेत.
देशातील बहुतेक रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नसतात, म्हणूनच जर या रूग्णांची ओळख पटली गेली असेल तर त्यांना घरी अलिप्त राहण्याचा सल्ला देण्यात येईल. मात्र ज्यांची अशी पुरेशी व्यवस्था नाही त्यांना शासकीय केंद्रात ठेवले जाईल. तसेच घरी अलिप्तपणे पाठविल्या जाणार्या रुग्णांना औषधोपचाराचे मोफत किट मिळणार आहे.
या किटमध्ये ५०० मिलीग्राम पॅरासिटामॉल, व्हिटॅमिन आणि आयव्हरमेक्टिन गोळ्या असतील. तसेच रुग्णालयाचा एक फोन नंबर देखील द्यावा, सर्दी-ताप आणि श्वसन संसर्गासाठी प्रत्येक उपकेंद्रात ओपीडीची व्यवस्था केली पाहिजे आणि त्याची वेळ निश्चित केली आहे.
संशयितांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या आरोग्य केंद्रांवर जलद तपासणी केली जाऊ शकते किंवा त्यांचे नमुने जवळच्या कोविड केंद्रांवर पाठवले जाऊ शकतात. आरोग्य अधिकारी आणि आशा कर्मचारी (एएनएम) यांच्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रावर किट असावे, आरोग्य केंद्रांवर तपासणी केल्यानंतर, चाचणी अहवाल येईपर्यंत रुग्णाला अलग ठेवण्याचा सल्ला देण्यात यावा.
कोरोना रूग्णाच्या ऑक्सिजनची पातळी तपासणे फार महत्वाचे आहे. प्रत्येक गावात नाडी ऑक्सिमीटर आणि थर्मामीटरचे पुरेसे प्रमाण असले पाहिजे. प्रत्येक उपयोगानंतर, सॅनिटायझरमध्ये भिजवलेल्या कपड्याने थर्मामीटर आणि ऑक्सिमीटर स्वच्छ करावे, श्वास घेण्यात अडचण, ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्याच्या खाली, छातीत दबाव किंवा वेदना, मानसिक गोंधळ किंवा गरज पडल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, रुग्णाला त्वरित आरोग्य केंद्रात पाठवावे.