विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावासाठी एअरोसोल (हवेतील द्रव किंवा घन कण) आणि ड्रॉपलेट्स ( खोकला किंवा शिंकेतून आलेले थुंकीचे शिंतोडे) या गोष्टी कारणीभूत आहेत. त्यावर मात करण्यासाठी अमेरिकेच्या संशोधकांनी एक नवे तंत्र विकसित केले आहे. हे तंत्र शिंका आणि खोकल्यातून निघणार्या ड्रॉपलेट्सचा फैलाव रोखू शकते.
ड्रॉपलेट्चा फैलाव रोखण्यासाठी एक चिकट पदार्थ विकसित करण्यात आला आहे. या पदार्थाला काचेसारख्या पृष्ठभागावर लावू शकतो. शिंका किंवा खोकला आल्यानंतर बाहेर उडालेले ड्रॉपलेट्स त्यावर चिकटतील. त्यासोबतच कोरोना विषाणूसुद्धा त्यावर चिकटेल. परिणामी विषाणूचा फैलाव होण्यापासून रोखता येणार आहे.
या पदार्थाला विकसित करण्यासाठी संशोधकांनी हेअर कंडिशनरमध्ये वापर होणार्या सामग्रीचा उपयोग केला आहे. कोरोनासह इतर संसर्गांविरोधात लढण्यासाठी हे तंत्र एक हत्यार होणार आहे. नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठातील अभियंते, प्राध्यापक जियाक्सिंग हुआंग यांनी याबाबत एक लेख लिहिला आहे. तो केम नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आला आहे.
त्यानुसार, ड्रॉपलेट्स प्रत्येक वेळी आतील पृष्ठांवर आदळतात. कोविड-१९ विषाणूचा श्वसन द्रव्य पदार्थाच्या माध्यमातून फैलाव होतो. कोणताही बाधित व्यक्ती बोलतो किंवा शिंकतो किंवा श्वास घेतो, तेव्हा त्याच्यामधून निघालेल्या ड्रॉपलेट्सद्वारे कोरोनाचा प्रसार होतो आणि दुसर्या व्यक्ती संक्रमित होतात. अशा परिस्थिती अशा अतिसूक्ष्म कणांना हटविण्यासाठी एकमात्र उपाय म्हणजे, खिडक्या उघडणे आणि फिल्टरेशन उपकरणांचा वापर करून या कणांना संपवून टाकणे होय.
संशोधकांनी या चिकट पदार्थाला ब्रशच्या माध्यमातून भिंतीवर लावण्यात आले. चिकट पदार्श लावलेली भिंत आणि न लावलेली भिंत या दोन्हींचे परीक्षण करण्यात आले. या परीक्षणात संशोधकांना चांगले यश मिळाले.