इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोना होऊ नये यासाठी लस घेऊनही तुम्ही संसर्गाच्या विळख्यात आला आला तरी आता घाबरण्याची गरज नाही. कारण, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, या प्रकारच्या संसर्गामुळे व्यक्तीच्या शरीरात सुपर इम्युनिटी विकसित होते आहे. रक्तातील अँटीबॉडीजच्या आधारे अमेरिकन शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे.
अमेरिकेतील ऑरेगन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी १०४ व्यक्तींच्या रक्त नमुन्यांचा अभ्यास केला. ज्यांना लसीचे दोन डोस मिळाले होते. संशोधकांना असे आढळून आले की, आतापर्यंत कोरोनापासून वाचलेल्या व्यक्तींपेक्षा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये अँटीबॉडीजची पातळी दहापट जास्त असल्याचे आढळून आले आहे. तसेच, ज्या व्यक्तींना अँटी-कोरोना लस लागण्यापूर्वी संसर्ग झाला होता, त्यांच्या रक्तात अँटीबॉडीजची पातळीही चांगली असल्याचे आढळून आले. मात्र, हे संशोधन ओमिक्रॉन प्रकार येण्यापूर्वी केले गेले आहे. मात्र ही सुपर इम्युनिटीदेखील ओमिक्रॉनला हरवू शकते, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
सुपर इम्युनिटीच्या परिणामापर्यंत पोहोचण्यासाठी, वैज्ञानिकांनी संशोधनात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींच्या रक्ताचे नमुने कोरोनाचे अल्फा, बीटा, गामा या तीन प्रकारांसमोर आणले. सर्व व्यक्तींना फायझर लसीचे दोन्ही डोस मिळाले होते. चाचणीत सहभागी झालेल्या व्यक्तींना पूर्वीच्या संसर्गाच्या आधारावर तीन गटांमध्ये विभागण्यात आले होते. यापैकी ४२ अशा व्यक्ती होत्या ज्यांना कधीही संसर्ग झाला नव्हता.
संशोधक डॉ. फिकाडू ताफासे यांच्या मते, तुम्हाला प्रथम संसर्ग झाला आहे, नंतर लसीकरण केले आहे किंवा प्रथम लसीकरण केले आहे आणि नंतर संसर्ग झाला आहे, याने काही फरक पडत नाही. दोन्ही प्रकरणांमध्ये, अँटीबॉडीजची पातळी जास्त असल्याचे आढळून आले आहे जे विषाणूशी लढण्यासाठी सुपर इम्युनिटी म्हणून काम करेल. संशोधनात सहभागी असलेले संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. मार्सेल कर्लिन म्हणतात, ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही किंवा ज्यांना लसीकरण केले गेले नाही त्यांच्यासाठी कोरोनाचा धोका जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घेतली पाहिजे.