मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम बॉलिवूडवरही झाला आहे. त्यामुळेच अनेक चित्रपटांचे शुटींगही रखडले आहे. अनेक निर्मात्यांना त्याचा मोठा फटका बसला असून कोरोनाचा प्रकोप कधी कमी होणार, याची देखील शाश्वती कुणी देऊ शकत नाहीय. यात गंगुबाई काठियावाडी, रामसेतू आणि मिस्टर ले ले या चित्रपटांचे शुटींग तर तातडीने रद्द करण्यात आले आहे.
आमिर खान, रणबीर कपूर, अक्षय कुमार आणि आलिया भट यांच्यासारखे दिग्गज कलावंत यात आहेत. हे सर्व कलावंत पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले. मुख्य कलावंतच नसल्यामुळे निर्मात्यांना शुटींगच पुढे ढकलावे लागले.
रामसेतूमध्ये मुख्य भूमिका असलेला अक्षय कुमार याने ४ एप्रिलला सोशल मिडीयावर पोस्ट केली की तो पॉझिटीव्ह आला आहे. त्यावेळी शुटींग सुरू होते. तो पॉझिटिव्ह असल्याचे कळताच शुटींग थांबविण्यात आले. या चित्रपटासाठी एक भव्य सेट उभारण्यात आला आहे. आता हा सेट पुढच्या तारखेपर्यंत तसाच रिकामा राहील.
अभिषेक शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. गेल्या महिन्यात संजय लिला भंसाळी पॉझिटिव्ह आल्याने गंगुबाई काठियावाडीचे शुटींग थांबले. त्यानंतर आलियाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पुन्हा शुटींग रोखण्यात आले. या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झालेले असले तरीही शुटींग मात्र पूर्ण व्हायचे आहे.
मिस्टर ले ले
या चित्रपटात विकी कौशल आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे शुटींग थांबविण्यात आले आहे. या चित्रपटातील अनेक ज्युनियर कलाकारही पॉझिटिव्ह आले आहेत.
भूल भुलैय्या २
कार्तिक आर्यन कोरोनातून बाहेर पडला असला, तरीही त्याने जेव्हा ही माहिती दिली त्यावेळी भूल भुलैय्या २ चे शुटींग सुरू होते. त्यामुळे शुटींग थांबविण्यात आले. यात कियारा अडवाणीही मुख्य भूमिकेत आहे.