शनिवार, सप्टेंबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कोरोनाने ज्येष्ठांवर दुःखाचा डोंगर; आप्तेष्ट गमावले, कुटुंबियांकडून छळही

by Gautam Sancheti
जून 16, 2021 | 12:26 am
in महत्त्वाच्या बातम्या
0

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना काळात अनेकांनी आपले कुटुंबातील सदस्य, मित्र, नातेवाईक गमावले आहेत. या कठिण काळात प्रत्येक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आधीपासूनच दुर्लक्षित असलेले ज्येष्ठ नागरिक या काळात अधिक भरडले गेले आहेत. आर्थिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या ते खचल्याचे दिसत आहेत. देशातील काही महत्त्वाच्या शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले त्यामध्ये धक्कादायक खुलासे झालेले आहेत.
कोरोनामुळे जवळपास २०.८ टक्के ज्येष्ठांनी आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्रांना गमावले आहे. देशातील आरोग्य व्यवस्था आणि पायाभूत सुविधा अधिक बळकट असल्या असत्या तर या आप्तेष्टांना वाचविणे शक्य झाले असते, असे अनेकांचे मत आहे. देशातील ३,५२६ ज्येष्ठांचे सर्वेक्षण करून एक अहवाल तयार करण्यात आला असून, त्यामध्ये या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दुर्व्यवहार जागरुकता दिवसानिमित्त हेल्पएज इंडिया संस्थेने सहा शहरांमध्ये “द सायलेंट टारमेंटर ः कोविड-१९ अँड द एल्डरली”  सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले. या अभ्यासात मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, चेन्नईमध्ये ३,५२६ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
सर्वेक्षणात सहभागी २०.८ टक्के लोकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य किंवा मित्र गमावले. गमावलेल्या लोकांना वाचविण्यासाठी काय केले जाऊ शकले असते, हा प्रश्न विचारण्यात आला. त्यात ५०.८ टक्के लोकांनी आरोग्य आणि पायाभूत सुविधा, ४४.४ टक्के लोकांनी लशीची उपलब्धता आणि ३८.७ टक्के लोकांनी वेळेवर औषधे, लशीची उपलब्धतेबाबत उत्तरे दिली.
कोरोनाबाधित झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याबाबत ४२.१ लोकांना सर्वाधि चिंता होती. ३४.२ टक्के लोक बाधित झाल्याने चिंतत होते. आणखी एक चिंता म्हणजे अनेक ज्येष्ठ दुसर्यांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून होते. सर्वेक्षणात ४१.१ टक्के लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून होते. सर्वेक्षणानुसार, कोविडमुळे ५२.२ टक्के ज्येष्ठांच्या मिळकतीवर परिणाम झाला. नोकरी जाणे (३४.९ टक्के) आणि कुटुंबीयांच्या वेतनात कपात (३०.२ टक्के) ही प्रमुख कारणे होती.
महामारीदरम्यान आरोग्य चांगले ठेवणे कठिण झाले. त्यामधील ५२.४ टक्के लोक सांधेदुखीने पीडित होते. ४४.९ टक्के लोकांना चालण्यास त्रास होत होता. २४.४ टक्के लोकांची दृष्टी खराब झाली. तर १३.८ टक्के लोकांना लक्षात ठेवण्याची समस्या तसेच एकाग्रता कमी असस्याचे आढळले.
सर्वेक्षणात, कोरोनावर लस बनविल्याची कल्पना ५८.२ टक्के ज्येष्ठांना होती. तर ४१.८ टक्के लोकांना याची कल्पनाच नव्हती. जागरुक लोकांमध्ये ७८.७ टक्के ज्येष्ठांना लसीकरण खूपच महत्त्वाचे असल्याचे लक्षात आले होते. ६६.६ टक्के लोकांना कोविड लशीचा कमीत कमी एक डोस मिळाल होता.
जवळपास ४३.१ टक्के ज्येष्ठांनी सांगितले की समाजात ज्येष्ठांसोबत दुर्व्यवहाराच्या घटना सुरूच आहेत. १५.६ टक्के ज्येष्ठांसोबत दुर्व्यवहार झाला. दुर्व्यवहाराचा धोका वाढल्याचे ६२.१ टक्के ज्येष्ठांना वाटले आहे. दुर्व्यवहार करणारे मुले (४३.८ टक्के) आणि सून (२७.८ टक्के) तर १४.२ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांच्या मुलींनी त्यांच्याशी दुर्व्यवहार केला. कोरोना काळात आम्हाला दुर्व्यवहार, हिंसाचार आणि वादांशी संबंधित आमच्या एल्डर हेल्पलाइनवर एक हजाराहून अधिक कॉल आले. आधीच्या कॉलच्या तुलनेत हे १८ टक्के अधिक होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आजचे राशिभविष्य – बुधवार – १६ जून २०२१

Next Post

ट्रकने कुटुंबाला चिरडले; २० वर्षीय युवकावर दहशतवादाचा गुन्हा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Screenshot 20250920 151721 WhatsApp 1
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वरमध्ये गावगुंडाकडून पत्रकारांना बेदम मारहाण…काठी व दगडाचा वापर

सप्टेंबर 20, 2025
cbi
संमिश्र वार्ता

CBI ने या स्पर्धा परिक्षा घोटाळ्यातील भरती प्रकरणी पाच आरोपींना केली अटक…IAS सह उच्च अधिकारी जाळ्यात

सप्टेंबर 20, 2025
cidco1 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

या कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवला..इतक्या कामगारांना मिळाले १० लाखाचे धनादेश

सप्टेंबर 20, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधानांच्या १३०० स्मृतिचिन्हे ई-लिलावात नाशिक मधील श्री काळाराम मंदिरातील चांदीचा राम दरबार…या संकेतस्थळावर द्या भेट

सप्टेंबर 20, 2025
G1Ovmg XYAAE7vR e1758332093239
मुख्य बातमी

आशिया कपमध्ये भारताचा सलग तिसरा विजय….ओमानला २१ धावांनी केले पराभूत

सप्टेंबर 20, 2025
ladki bahin 750x375 1
राज्य

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू….

सप्टेंबर 20, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
महत्त्वाच्या बातम्या

मोठा निर्णय….अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवानाच होणार निलंबित

सप्टेंबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील, जाणून घ्या, शनिवार, २० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 19, 2025
Next Post
crime 6

ट्रकने कुटुंबाला चिरडले; २० वर्षीय युवकावर दहशतवादाचा गुन्हा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011